Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

हमाली करणाऱ्या Roshan Bhajankarने कष्टाचे दिवस काढले; नशीबाने थेट उघडलं बिग बॉसच्या घराचं दार

 हमाली करणाऱ्या Roshan Bhajankarने कष्टाचे दिवस काढले; नशीबाने थेट उघडलं बिग बॉसच्या घराचं दार
कलाकृती विशेष

हमाली करणाऱ्या Roshan Bhajankarने कष्टाचे दिवस काढले; नशीबाने थेट उघडलं बिग बॉसच्या घराचं दार

by रसिका शिंदे-पॉल 21/01/2026

मराठी बिग बॉस सीझन ६चे (Marathi Big Boss Season 6) सदस्य सध्या घरात तुफान राडा घालताना दिसतायत. दिवसेंदिवस प्रत्येक सदस्य आपला गेम improwise करताना दिसतोय. खरं तर घऱातील प्रत्येक खिलाडी वेगवेगळ्या बॅग्राऊंडचे आहेत, आणि याच सदस्यांमध्ये एक आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला देसी बॉडी बिल्डर. सामान्य माणूस टीव्हीवर जाण्याचं स्वप्न पाहून ते पुर्ण करु शकतो हे रोशन भजनकरने (Roshan Bhajankar) सिद्ध करुन दाखवलं. गोण्या उचलणारा, हमाली करणारा रोशन थेट बिग बॉसच्या घरात पोहोचलाय. जाणून घेऊयात त्याचा हमाल ते बॉडी बिल्डरपर्यंतचा प्रवास.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणूस शून्यातून विश्व कसं निर्माण करू शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे अमरावतीचा सुपुत्र रोशन भजनकर. रोशन हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील वरोडा गावचा. गेल्या १५ वर्षांपासून तो बडनेरा रेल्वे स्टेशनच्या मालधक्क्यावर हमालीचं काम करतोय. सिमेंटची पोती, खत आणि धान्यांच्या गोण्या उचलून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. एका सिमेंटच्या गोणीला त्याला ३ रुपये ४५ पैसे मिळत होते. दिवसाला शेकडो पोती उचलूनही त्याची व्यायामाची ओढ कमी झाली नाही आणि पोती उचलून जीममध्ये व्यायाम करत बॉडी बनवण्याचं त्याने स्वत:चं स्वप्न पुर्ण केलं.

================================

हे देखील वाचा : “Dilip Kumar यांनी पाकिस्तानातच राहाला जावं”; बाळासाहेब असं का म्हणाले होते?

================================

घरची परिस्थिती बेताची असल्यानं त्याला महागडे प्रोटीन्स किंवा डाएट परवडत नव्हतं. केवळ घरच्या जेवणावर आणि कष्टावर त्यानं आपली शरीरयष्टी कमावली. दिवसाला १०-१२ तास कष्टाचं काम आणि त्यानंतर तासनतास व्यायाम करणाऱ्या रोशनने प्रादेशिक स्तरावरील अनेक Body Building च्या स्पर्धा जिंकल्या आहेत. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी रोशनने रितेशला माझ्या मुलीमुळे आज मी इथे उभा आहे असं सांगितलं होतं. मुलीने मला एकदा बाबा तुम्ही टीव्हीवर कधी दिसणार? असा प्रश्न विचारला होता आणि तिच्यासाठी मी आज इथे उभा असल्याचं रोशनने सांगितलं होतं. आता कष्टायच्या हाताने गोणी उचलणारा रोशन बिग बॉसच्या सहाव्या सीझनची ट्रॉफी उचलणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amravati Colors Marathi entertainemnt news Maharashtra marathi big boss marathi big boss season 6 roshan bhajankar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.