
डायलॉगशिवाय गांधी विचार मांडणारा Gandhi Talks; सिद्धार्थ जाधव झळकणार विजय सेतुपतीसोबत!
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांनी १९१३ साली ‘राजा हरिश्चंद्र’ हा भारताचा पहिला मुकपट आपल्या भेटीला आणला होता. त्यानंतर आता जवळपास १२० वर्षांपेक्षा अधिक काळानंतर भारतीय चित्रपटसृष्टीत एक मुकपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. एकही संवाद नसणाऱ्या Gandhi Talks या चित्रपटातून चित्रपटसृष्टीचा पाया रचणाऱ्या मुकपटाचा पुन्हा एकदा प्रेक्षकांना २१व्या शतकात अनुभव घेता येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Setupati) प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासोबत मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव दिसणार आहे. त्यामुळे गांधी टॉक्स हा चित्रपट सिद्धार्थच्या करिअरमधील ही फार मोठी संधी असणार आहे. (Marathi Movie 2026)

‘गांधी टॉक्स’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून यात विजय सेतुपती (Vijay Setupati) आपल्या आईला पाठीवर घेऊन चालताना दिसतो. महादेव नावाच्या बेरोजगार तरुणाला कितीही प्रयत्न करुन नोकरी मिळत नाही. आयुष्यात आलेल्या अपयशातून वाट काढत असतानाच त्याची भेट एका अशा उद्योगपतीशी होते, ज्याची संपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असते. या भेटीतून महादेवच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते, जी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आता नेमकी ती कल्पना काय असेल याचं उत्तर ३० जानेवारी २०२६ रोजी उलगडणार आहे.

महत्वाचं म्हणजे २०२३ मध्ये International Film Festival (IFFI) मध्ये झळकलेल्या या चित्रपटाला ए.आर.रेहमान (A R Rehman) यांनी संगीत दिलं आहे. किशोर बेलेकर (Kishore Belekar) दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटात विजय सेतुपतीसह अरविंद स्वामी, आदिती राव हैदरी, सिद्धार्थ जाधव असे मातब्बर कलाकार दिसणार आहेत. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता Ruturaj Phadke दोन वर्षांनी कमबॅक करणार!
================================
गांधीवादी विचार, सामाजिक वास्तव आणि मूक अभिनयाची ताकद यांचा संगम असलेला ‘गांधी टॉक्स’ (Gandhi Talks) चित्रपट ३० जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरं तर एकही संवाद नसल्यामुळे मुळात तो कुठल्या भाषेतला चित्रपट आहे हे सांगणं जरा कठिणच आहे. परंतु, चित्रपटाचे दिग्दर्शक मराठी असून हा नक्कीच मराठी चित्रपटसृष्टीतील मूकपट असून तो तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम या भाषेतील प्रेक्षकांपर्यंत देखील पोहोचवला जाणार आहे. (Gandhi Talks Movie Cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi