Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam ने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना नवं बळ!

 Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam ने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना नवं बळ!
मिक्स मसाला

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam ने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना नवं बळ!

by रसिका शिंदे-पॉल 21/01/2026

मराठी चित्रपटसृष्टीत क्वचितच असा एखादा चित्रपट येतो, जो केवळ पडद्यावर कथा सांगत नाही, तर प्रेक्षकांच्या मनात चळवळ उभी करतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या नेमकं तेच करत आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या चित्रपटाचा निर्मिती खर्च हा ६.५० कोटी असून या चित्रपटाने आज बॉक्स ऑफिसवर २० कोटींच्या वर कमाई करत मोठा टप्पा गाठला आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला आपलंसं केलं. कथेमधील प्रामाणिकपणा, शिक्षक-विद्यार्थ्यांमधील नातं आणि मराठी माध्यम शाळेचा आत्मसन्मान या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना थेट भिडल्या. राज्यभरातील अनेक शाळा आणि शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेत सामूहिक शोज आयोजित केले आहेत. माजी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही चित्रपट पाहाताना दिसत आहेत. यानिमित्ताने त्यांचे रियुनिअनही ते आयोजित करत आहेत. या चित्रपटाने मराठी माणसांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नव्यानं बळ दिलं आहे. मराठी माध्यम शाळांविषयी असलेली न्यूनगंडाची भावना दूर करत, ‘आपली शाळा, आपली भाषा आणि आपली ओळख’ याचा अभिमान पुन्हा जागा केला आहे. चित्रपट संपल्यानंतर दिसणारे टाळ्यांचे गजर, भारावलेले चेहरे आणि डोळ्यांतला विश्वास यावरूनच या चित्रपटाचा प्रभाव स्पष्ट जाणवतो.

प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ आम्ही हा चित्रपट करताना फक्त एक गोष्ट मनात ठेवली होती, मराठी शाळेची कथा प्रामाणिकपणे सांगायची. आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हा चित्रपट पाहून जे बळ घेत आहेत, त्यातूनच मला वाटतं की, या सगळ्या जागृतीमुळे शिक्षण व्यवस्थेलाही याची जाणीव होईल. आपल्या मराठी शाळा टिकाव्यात, फुलाव्यात आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत जाव्यात, हीच एकमेव आशा आणि इच्छा या चित्रपटामागे होती.”

================================

हे देखील वाचा : “शिवरायांवर जर का आम्ही चित्रपट करत असू तर…”; Digpal Lanjekar यांनी खोपकरांना दिलं प्रत्युत्तर

================================

या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amey wagh bollywood update Entertainment News Hemant Dhome kshitee jog Marathi Movie prajakta koli siddharth chandekar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.