Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mayasabha Trailer: जावेद जाफ्रीसोबत झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

 Mayasabha Trailer: जावेद जाफ्रीसोबत झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री
मिक्स मसाला

Mayasabha Trailer: जावेद जाफ्रीसोबत झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

by रसिका शिंदे-पॉल 22/01/2026

‘तुंबाड’ (Tumbaad) चित्रपटाच्या यशानंतर आता दिग्दर्शक राही अनिल बर्वे ‘मयसभा’ (Mayasabha – The Hall of Illusion) हा नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला आणणार आहेत. बऱ्याच वर्षांपासून ज्या चित्रपटाची चर्चा सुरु होती त्याचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे जवळपास ४० वर्ष इंडस्ट्रीत काम करणारे जावेद जाफ्री (Jaaved Jafri) पहिल्यांदाच लीड रोल या चित्रपटात साकारणार आहेत. तसेच, अभिमानाची बाब म्हणजे त्यांच्यासोबत बॉलिवूडची अभिनेत्री नाही तर मराठमोळी अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आणि ती म्हणजे वीणा जामकर.

तर, ‘मयसभा – द हॉल ऑफ इल्युझन’ चित्रपटाच्या जबरदस्त टीझरनंतर आता ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राही अनिल बर्वे (Rahi Anil Barve) प्रेक्षकांच्या मानसिकतेला चॅलेंज देणार आहेत. ‘मयसभा – द हॉल ऑफ इल्युझन’मध्ये आपल्याला एक वेगळाच दृष्टीकोन आणि वास्तवाची प्रखर जाणीव पाहायला मिळते. ट्रेलरवरुन तरी प्रत्येकाचा परफॉर्मन्स कथानकाप्रमाणेच प्रेक्षकांना बुचकळ्यात टाकणारा आहे. (Bollywood)

‘मयसभा – द हॉल ऑफ इल्युझन’ या चित्रपटात मुख्य भूमिका जावेद जाफरी यांची असून त्यांच्या सोबत मोहम्मद समद, वीणा जामकर (Veena Jamkar) आणि दीपक दामले हे कलाकार झळकणार आहेत. ३० जानेवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहात हा चित्रपट रिलीज होणार असून गिरीश पटेल आणि अंकुर जे सिंह यांच्यासह जिरकॉन फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

================================

हे देखील वाचा : Tumbbad राही बर्वेने बनवला नाही तर….

================================

तर, दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जवळपास ८ वर्ष त्यांनी ‘तुंबाड’ या चित्रपटाचं शुटींग केलं होतं… हस्तरच्या जगात घेऊन जाणाऱ्या या चित्रपटाने फारसे पुरस्कार मिळवले नसले तरी जागतिक पातळीवर कौतुकाची थाप मिळवली… सोहम शाह (Sohum Shah) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘तुंबाड’ चित्रपटाचा सीक्वेल ‘तुंबाड २’ मेकिंगच्या प्रोसेसमध्ये आहे… या व्यतिरिक्त राही अनिल यांचे ‘पहाडपांगिरा’, ‘पक्षीतिर्थ’, ‘गुलकंद टेल्स’ आणि ‘रक्त ब्रम्हांड : द ब्लडी किंगडम’ हे आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत…. (Rahi Anil Barve Upcoming Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Entertainment News jaaved jafri mayasabha Mayasabha – The Hall of Illusion mayasabha trailer rahi anil barve tumbaad veena jamkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.