Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rani Mukherjeeला लेक आदिराने लिहिलं भावनिक पत्र, म्हणाली, ‘आई-मुलगी आहोत…’

 Rani Mukherjeeला लेक आदिराने लिहिलं भावनिक पत्र, म्हणाली, ‘आई-मुलगी आहोत…’
मिक्स मसाला

Rani Mukherjeeला लेक आदिराने लिहिलं भावनिक पत्र, म्हणाली, ‘आई-मुलगी आहोत…’

by रसिका शिंदे-पॉल 23/01/2026

‘राजा की आऐगी बारात’ हा १९९६ मध्ये चित्रपट रिलीज झाला आणि बॉलिवूडला मिळाली एक हरहुन्नरी अभिनेत्री ती म्हणजे राणी मुखर्जी (Rani Mukherjee). इंडस्ट्रीत ३० वर्षांचा अभिनयाचा प्रवास तिने पुर्ण केला. इतकंच नाही तर ३० वर्ष काम केल्यानंतर तिला पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार देखील नुकताच मिळाला. आता सध्या ती ‘मर्दानी ३’ या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार असून याच निमित्ताने करण जोहर आणि राणी मुखर्जीच्या गप्पा रंगल्या होत्या. यावेळी राणीच्या मुलीने आदिराने आपल्या आईला लिहिलेलं भावनिक पत्र करणने वाचून दाखवलं आणि तिच्या डोळ्यांत आनंदाश्रु आले.

राणी मुखर्जीचा इंडस्ट्रीतला ३० वर्षांचा प्रवास पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक खास कार्यक्रम आयोजित का होता ज्याचं सुत्रसंचन दिग्दर्शक करण जोहर याने केलं होतं. यावेळी राणी सोबतच्या गप्पांमध्ये त्याने तिचा पूर्ण प्रवास उलगडला. तसेच, राणीच्या मुलीने आदिराने आपल्या आईसाठी लिहिलेले पत्र देखील त्याने वाचलं. हे पत्र आदिराने राणीच्या 30 वर्षांच्या सिनेसृष्टीतील प्रवासाच्या निमित्ताने लिहिले होते.

आदिराने पत्रात आपल्या आईबद्दल खूप प्रेम आणि आदर व्यक्त केला. तिने राणीला “जगातील सर्वोत्तम आई” असे संबोधले आणि त्यांच्यातील नात्याची ताकद अधोरेखित केली. पत्रात आदिराने लिहिले की, त्यांनी एकत्र अनेक आठवणी तयार केल्या आहेत ज्या आनंदाच्या, रडण्याच्या आणि मजेदार क्षणांच्या आहेत.

आदिराने या पत्रात तिच्या आईकडून मिळालेल्या गुणांबद्दल आणि त्यांच्या समानतेबद्दल देखील लिहिलं आहे. तिने म्हटले की, तिला आईकडून अभिनय, नृत्य आणि चित्रकलेची कला मिळाली आहे. पण तिने हे देखील नमूद केले की आईचा लवकर राग येणे हा गुण तिला आवडत नाही, परंतु तोही तिच्याकडूनच आलेला आहे. आदिराने पुढे असं देखील लिहिले की, ‘आपण दोघे थोडे वेगळे आहोत, जसे तुला गडद रंग आवडतात आणि मला हलके रंग, पण आपण अनेक बाबतीत सारखेच आहोत आपले दिसणे, सवयी आणि प्रतिभा.’ तिने स्वतःच्या काही गुणांचा उल्लेख करत म्हटले की, ‘माझ्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या तुझ्यात नाहीत, जसे की माझ्या शाळेतील गणिताची कौशल्ये.’ पत्राच्या शेवटी आदिराने भावनिक शब्दांत लिहिले ‘सर्व काही बाजूला ठेवले तरी आपण एकाच रक्ताचे आहोत. आपण आई-मुलगी आहोत आणि आपले नाते कायम राहील. मी तुझ्यावर खूप प्रेम करते, मम्मा.’ या शब्दांनी राणीच्या डोळ्यांतून अश्रू आले होते.

================================

हे देखील वाचा : Rekha To Rani Mukherjee : बॉलीवूडचे ‘हे’ कलाकार इन्स्टाग्रामपासून आहेत लांब

================================

दरम्यान, राणीच्या चित्रपटांबद्द बोलायचं झालं तर, ‘कुछ कुछ होता है’, ‘हॅलो ब्रदर’, ‘मेहेंदी’, ‘नायक’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चलते चलते’, ‘चोरी चोरी’, ‘कल हो ना हो’, ‘ब्लॅक’, ‘पहेली’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘मिसेस चॅटर्जी इन नॉर्वे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने कामं केली आहेत.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aadira chopra Bollywood bollywood update Celebrity News Entertainment karan johar mardaani 3 Rani mukherjee rani mukherjee movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.