
Bigg Boss Marathi 6: प्राजक्तावर केलेली दादागिरी अनुश्रीला पडली महागात; रितेशने सुनावले खडेबोल !
Bigg Boss Marathi 6 च्या घरात कामाच्या वाटपावरून होणारे वाद हे नवीन नाहीत, मात्र यंदाच्या पर्वात हे वाद वैयक्तिक पातळीवर जाऊन पोहोचताना दिसत आहेत. विशेषतः अनुश्री माने सतत वादांच्या केंद्रस्थानी असल्याने तिच्या वागणुकीवर घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.राकेश बापटसोबत (Rakesh Bapat) झालेल्या वादानंतर अनुश्री माने ( Anushree Mane) आणि प्राजक्ता शुक्रे (Prajakta Shukre) यांच्यातील भांडण चांगलंच पेटलं. घरातील ड्युटी करण्यास नकार देणं, त्यावरून टोमणे, आणि पुढे थेट अपशब्दांपर्यंत गेलेला हा वाद पाहता वातावरण अक्षरशः तापलं. गार्डन एरियामधील या वादानंतर प्राजक्ताने दिपालीकडे तक्रार केल्याने हा मुद्दा आणखी चिघळला. (Bigg Boss Marathi 6)

वादाच्या ओघात वापरलेली भाषा आणि केलेली विधाने ही बिग बॉसच्या घरातील शिस्तीला धरून नसल्याचं स्पष्ट झालं. ‘आईला घेऊन आलीस, बाबाला पण घेऊन ये’ यासारख्या वक्तव्यांमुळे परिस्थिती अधिकच बिघडली आणि अखेर ‘भाऊचा धक्का’ या टास्कमध्ये रितेश भाऊंनी अनुश्रीला खडेबोल सुनावले.रितेश भाऊंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, हे घर करमणुकीसाठी असलं तरी इथे नियम आणि शिस्त पाळणे अनिवार्य आहे. कोणाचाही अपमान करणारी भाषा खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी देत त्यांनी अनुश्रीला तिच्या वर्तनाचा जाहीरपणे जाब विचारला.

विशेष म्हणजे, याआधी राकेश बापटसोबत झालेल्या वादात अनुश्रीने थेट त्याच्या चारित्र्यावर शंका घेतल्याने घरातील सदस्य आधीच तिच्या विरोधात गेले होते. आता प्राजक्ताला दिलेल्या शिव्यांमुळे सोशल मीडियावरही प्रेक्षकांचा संताप उफाळून आला आहे. (Bigg Boss Marathi 6)
==============================
==============================
नेटकऱ्यांनी अनुश्रीच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून तिला घरातून बाहेर काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काहींनी तिच्या वाढत्या अहंकारावर बोट ठेवलं, तर काहींनी तिच्या बोलण्याच्या पातळीवर टीका केली आहे.आगामी भागांमध्ये बिग बॉस अनुश्रीविषयी काय निर्णय घेतात, ती स्वतःच्या वागण्यात बदल करते का, की हा वाद तिच्या खेळावर भारी पडतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.