Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Punha Ekda Sade Made Teen Title Song:  भावंडांमधली मस्ती आणि निखळ आपुलकी ’पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रदर्शित!

 Punha Ekda Sade Made Teen Title Song:  भावंडांमधली मस्ती आणि निखळ आपुलकी ’पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रदर्शित!
Punha Ekda Sade Made Teen Movie
मिक्स मसाला

Punha Ekda Sade Made Teen Title Song:  भावंडांमधली मस्ती आणि निखळ आपुलकी ’पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रदर्शित!

by Team KalakrutiMedia 28/01/2026

भावंडांमधली मस्ती, टोमण्यांची फटकेबाजी आणि निखळ आपुलकी यांचा गोड गोंधळ म्हणजेच कुरळे बंधू! हाच खट्याळ, मनमोकळा उत्साह ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ (Punha Ekda Sade Made Teen) या आगामी मराठी चित्रपटाच्या नव्या प्रमोशनल गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे. आधीच टीझर आणि ट्रेलरने चर्चेचा जोर धरलेला असताना, हे नव्यानं प्रदर्शित झालेलं गाणं सोशल मीडियावर झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या गाण्याला खास रंग चढवतो तो अवधूत गुप्ते यांचा उत्साही आवाज. त्यांच्या गायनातील सहजता आणि जोश गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेतो. संगीतकार गौरव चाटी आणि आदित्य बेडेकर यांनी तालबद्ध, मजेशीर संगीत दिलं असून, गीतकार विक्रांत हिरनाईक यांच्या साध्या पण हृदयस्पर्शी शब्दांतून तीन भावांमधील निरागस नातं सुंदरपणे उलगडतं. हे गाणं ऐकताना नकळतच मूड फ्रेश होतो आणि चेहऱ्यावर हसू उमटतं. (Punha Ekda Sade Made Teen Title Song)

Punha Ekda Sade Made Teen
Punha Ekda Sade Made Teen Movie

विशेष म्हणजे हे गाणं चित्रपटाच्या कथानकाचा भाग नसून खास प्रमोशनसाठी तयार करण्यात आलं आहे. कथेत स्वतंत्र गाण्याची जागा नसल्यामुळे निर्मात्यांनी वेगळ्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. मात्र आधीच अजय–अतुल यांच्या संगीताचं गाणं प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवून गेलं असल्याने, त्याच भावनेशी नातं राखत पण पूर्णपणे वेगळ्या चवीचं काहीतरी देण्याचं आव्हान होतं.

Punha Ekda Sade Made Teen
Punha Ekda Sade Made Teen Movie

या संदर्भात दिग्दर्शक अंकुश चौधरी सांगतात की, चित्रपटासाठी नवं गाणं बसवणं शक्य नसल्यामुळे प्रमोशनल साँगचा पर्याय निवडण्यात आला. अजय–अतुल यांच्याशी चर्चा झाली होती, पण वेळेच्या अडचणीमुळे ते शक्य झालं नाही. त्याचदरम्यान चित्रपटातील एका बॅकग्राऊंड म्युझिकवरून प्रेरणा घेऊन नव्या गाण्याची कल्पना आकाराला आली. यावेळी प्रेमकथांऐवजी तीन भावांच्या नात्यावर लक्ष केंद्रित करत, हलकंफुलकं आणि मनाला भिडणारं गाणं बनवण्यात आलं.आता टीझर, ट्रेलर आणि या प्रमोशनल गाण्यानंतर ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’बद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे. मोठ्या पडद्यावर या तीन भावांचा धमाल प्रवास पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. हा चित्रपट ३० जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  (Punha Ekda Sade Made Teen Title Song)

===========================

हे देखील वाचा: Jai Jai Swami Samarth मालिकेत निर्णायक वळण; भावनिक अध्यायाची होणार सुरुवात!

===========================

चित्रपटात भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार असून, संजय नार्वेकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स आणि ईओडी मीडिया यांच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाला अमेय विनोद खोपकर पिक्चर्सची साथ लाभली आहे. उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते असून, सहनिर्मितीची जबाबदारी मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट यांनी सांभाळली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ankush Chaudhari Film Bharat Jadhav Movie Celebrity Entertainment Latest Marathi Songs Makrand Anaspure Film Marathi Brotherhood Movie Marathi Cinema Updates marathi entertainment news Marathi Family Comedy Marathi Film Promotion Marathi Movie Marathi Movie Song New Marathi Movie 2026 Punha Sade Made Teen Punha Sade Made Teen Marathi Movie Punha Sade Made Teen Promotional Song Punha Sade Made Teen Song Release Punha Sade Made Teen Title Song Rinku Rajguru Film Siddharth Jadhav Movie Upcoming Marathi movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.