Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“महाराष्ट्राच्या प्रशासनावर घट्ट पकड असलेला अॅडमिनिस्ट्रेटर गेला”; Ajit Pawar यांच्या निधनानंतर मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

 “महाराष्ट्राच्या प्रशासनावर घट्ट पकड असलेला अॅडमिनिस्ट्रेटर गेला”; Ajit Pawar यांच्या निधनानंतर मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
मिक्स मसाला

“महाराष्ट्राच्या प्रशासनावर घट्ट पकड असलेला अॅडमिनिस्ट्रेटर गेला”; Ajit Pawar यांच्या निधनानंतर मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

by रसिका शिंदे-पॉल 28/01/2026

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता शोकाकूल झाली आहे. राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते, केंद्रातील नेते, आमदार-खासदारांसह सामान्य नागरिक अजितदादांना श्रद्धांजली वाहात आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांनी देखील अजित पवारांच्या निधनावर शोक व्यक्त करत भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. (DCM Ajit Pawar Death)

अजित पवारांना श्रद्धांजली वाहात मराठी गायक सलील कुलकर्णीने भावुक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “विश्वासचं बसत नाहीये…अजितदादा” तर, “ही गोष्ट स्वीकारणं अत्यंत कठीण आहे…अजित दादा तुमच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण आहे…भावपूर्ण श्रद्धांजली”, अशी सायली संजीवने पोस्ट केली आहे. बारामतीचा अभिनेता वैभव चव्हाणने “अजित दादा… मोठं नुकसान झालं” अशी पोस्ट शेअर करत अजित पवारांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. (Sayali Sanjeev & Saleel Kulkarni)

तर, अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे याने पोस्ट केली आहे की, “माझे अत्यंत लाडके नेते, महाराष्ट्राचे लोकनेते आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा यांच्या विमान अपघातामुळे झालेल्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. हे महाराष्ट्राचे कधीही न भरुन येणारे नुकसान आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनावर घट्ट पकड असलेला अॅडमिनिस्ट्रेटर गेला. लोकांचं काम करणारा माणूस गेला. अलविदा दादा! भावपूर्ण श्रद्धांजली”. (Hemant Dhome)

सुबोध भावेने लिहिले आहे की, “अजित दादा, महाराष्ट्राच्या राजकारणातील तुम्ही एक विलक्षण व्यक्तिमत्व होतात. तुम्ही खुप आवडायचा. तुमची काम करण्याची पद्धत, तुमचा हजरजबाबीपणा तसेच तुमची सर्वसामान्य माणसांशी थेट त्यांच्या भाषेत संवाद साधण्याची पद्धत, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमचं असलेलं लक्ष हे सर्व आवडायचं. दादा तुमची उणीव कायम भासत राहील. तुमच्याशी झालेल्या भेटी कायम स्मरणात राहती. दादा तुम्ही कायम आठवत राहाल”. (Subodh Bhave)

सुनील बर्वेंनी “अजित दादा, फारंच चटका लावू गेलात”, असं लिहिलं आहे. तर, स्वप्निल जोशीने “महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचं स्थान वेगळं आणि उठून दिसणारं होतं आणि कायम राहिल. तुमचा साधेपणा, काम करण्याची तुमची तळमळ, मनाला भिडणारी होती. सामान्य माणसांशी त्यांचा आपलं करुन संवाद साधण्याचं तुचं कसब खरोखर दुर्मिळ होतं”, असं लिहिल श्रद्धांजली वाहिली आहे. (Sunil Barve & Swapnil Joshi)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ajit pawar ajit pawar death dcm of maharashtra ajit pawar maharashtra politics subodh bhave swapnil joshi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.