
“मी कुणाच्या वाट्याला जात नाही पण माझ्या वाट्याला कुणी गेलं तर…”; जेव्हा Ajit Pawar यांनी संकर्षणची घेतली होती फिरकी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर आभाळ कोसळलं आहे. दिवसरात्र काम करणारे आणि तितकेच मिश्किल आणि सढळ स्वभाव असणाऱ्या अजित दादांचं मराठी कलाकारांशी देखील खास नातं होतं. एकीकडे अजित दादांची जुनी भाषण व्हायरल होत असताना मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याची अजित पवारांनी घेतलेली फिरकी सध्या चर्चेत आहे. नेमकी काय म्हणाले होते अजितदादा जाणून घेऊयात…
२०२५ मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला होता आणि त्या कार्यक्रमाला अजित पवार हजर होते. यावेळी संकर्षणच्या एका कवितेवरून अजितदादांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली होती. “संकर्षणने मराठवाड्याचा उल्लेख केला, सासुरवाडीचा उल्लेख केला.. बरंच काही बोलून गेला. जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे त्यांचं टिपिकल वाक्य. परभणीत काही असो किंवा नसो.. मात्र एवढं वाक्य त्यांना चांगलं जमतं. खोटं नाही सांगत, पण मी तिथे काम केलंय. त्यालाही माहीत आहे की तिथली काय परिस्थिती आहे? त्याने मघाशी ५० टक्के तर खोटंच सांगितलं आहे. हे त्याच्या तोंडावर सांगतो. कारण तुम्हाला माहीत आहे की मी किती खरं बोलतो,” अजित पवार असं म्हणतात लोकांमध्ये हशा पिकला होता.(Marathi Entertainment News)

यावेळी अजितदादांनी निवडणुकीच्या काळात संकर्षणने केलेल्या कवितेचा उल्लेख करच पुढे म्हणाले की, “पवार तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले.” तेवढ्यात संकर्षण त्यांना सांगतो, “सर, हे मी नव्हतो बोललो.” त्यानंतरही अजितदादा फिरकी घेत म्हणाले होते की, “मघाशी मी न म्हटलेलं किती सांगितलंस? माझ्या कामाची एक पद्धत असते. मी कुणाच्या वाट्याला जात नाही, पण कुणी माझ्या वाट्याला गेलं तर मी त्याला सोडत नाही. ही गोष्ट उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु आता ती कविता मी तुझ्या नावावर खपवतो. बाबा रे, मी स्वत: गाईचं शेण काढलंय, धारा काढल्या आहेत. मी शेतात राबतो. आता गणेशोत्सवात मी बारामतीला जाणार आहे. तेव्हासुद्धा तासभर काढून शेतात जाणार आहे. मी अचानक राजकारणात आलो. मला सगळे म्हणायचे की तू इतका स्पष्ट बोलणार आहेस, तू राजकारणात टिकणार नाहीस. पण त्यांना काय माहीत होतं की जनतेला हेच आवडतं आणि त्याच्यामुळे नाणं पुढे जाईल.” (Ajit Pawar News)
================================
================================
दरम्यान, या कार्यक्रमात संकर्षणने अजित पवारांचा एक खास किस्सा सांगितला होता. तो म्हणाला होता की, “अजितदादा पवार मला ‘सासरचा माणूस’ असं म्हणतात. कारण त्यांच्या पत्नी आणि मी मराठवाड्यातले आहोत, त्यामुळे ते मला तू खूप मान देऊन बोलतात. मलाही ते फार आवडतं. कुणाला आवडत नाही,” असं म्हणत एका जुन्या कार्यक्रमातील किस्सा सांगतो. त्याचप्रमाणे अजितदादा शब्दाचे पक्के आहेत, ते माझ्या नाटकाला आवर्जून येतील, असाही विश्वास त्याने त्यावेळी जाहिरपणे व्यक्त केला होता. (Maharashtra Politics)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi