
Ajit Pawar यांच्या निधनाने अख्खं बॉलिवूडही हळहळलं; अजय देवगण तेअनुपम खेर सगळ्यांनीच वाहिली श्रद्धांजली
महाराष्ट्राचे हरहुन्नरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झालं. ज्या बारामतीच्या मातीत कणखर आणि उत्कृष्ट राजकारणी नेते म्हणून अजित पवार घडले त्याच मातीत त्यांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. अजितदादांच्या निधनानंतर मराठीसह बॉलिवूड कलाकारांनी देखील हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहीली आहे. (Ajit Pawar Death)
अभिनेता अजय देवगण याने पोस्ट करत लिहिलं आहे की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाने धक्का बसला आणि दुःख झालं. त्यांच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि या मोठ्या नुकसानाने प्रभावित झालेल्या सर्वांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो”. (Ajay Devgan)

तर, अभिनेता अक्षय कुमार याने लिहिलं आहे की, “अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून सुन्न झालो आहे. देव त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख पचवण्यासाठी हिंमत देवो. ओम शांती”. संजय दत्तने लिहिलंय की, “अजित पवार हे डायनॅमिक नेते होते. त्यांनी आपली छाप मागे सोडली आहे. अजित पवारांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो”. (Akshay Kumar & Sanjay Dutt)

अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत अजित पवार यांना श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिलंय की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाने खूप मोठा धक्का बसला आणि दुःख झाले आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा ते खूप सज्जन आणि दयाळू होते! माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. ओम शांती!”. (Anupam Kher)
================================
================================
तर, अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरनं “अत्यंत दुखद… भावपूर्ण श्रद्धांजली… ओम शांति” या शब्दात अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, अभिनेते रवी किशन यांनी सोशल मीडियावरून श्रध्दांजली वाहिली. त्यांनी लिहिलं आहे की, “महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली. मी भगवान श्री राम यांच्याकडे त्यांच्या आत्म्यांना शांती आणि शोकाकुल कुटुंबांला हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करतो. ओम शांती”. (Urmila Matondkar)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi