Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

 Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!
कलाकृती विशेष

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

by रसिका शिंदे-पॉल 30/01/2026

राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘मयसभा’ चित्रटाचे शेवटचे काही मिनिटं बघून तुमचे डोळे बंदच होणार नाही, तोंड उघडच राहील…  ‘तुंबाड’ नावाचा एक कल्ट क्लासिक सिनेमा देऊन भारतीय चित्रपटसृष्टीला हादरवणारा जादूगार राही अनिल बर्वे आता आपल्यासाठी घेऊन आला आहे ‘मयसभा: द हॉल ऑफ इल्यूजन’.

महाभारतात पांडवांची एक मायासभा होती या सभेच्या जमिनी इतक्या चकचकीत होत्या की, समोर जमीन आहे की पाणी हे ओळखणं अशक्य व्हायचं . जिथे उघडं द्वार दिसायचं तिथे प्रत्यक्षात भिंत असायची, आणि जिथे भिंत वाटायची तिथून जाण्याचा मार्ग असायचा. ही पांडवांची मयसभा होती.

पण राहीने निर्माण केलेली मयसभा तुमच्या पासून असं काही लपवून ठेवत नाही, पण तरीही तुम्हाला ते दिसत नाही… जो पर्यंत ते दाखवलं जात नाही. ही एखादी साधीसुधी कथा नाही आहे, हा एक ‘अनुभव’ आहे. एक जुनं पडीक थिएटर जिथे फक्त चारच पात्रं आहेत आणि फक्त एक रात्र आहे. पण ही चार पात्रं ९९ मिनिटं तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतात. मयसभा एक स्लो poison आहे जे हळुहळू तुमच्या मेंदूवर स्वार होतं.

चित्रपटाचा प्लॉट म्हणजे परमेश्वर खन्ना बॉलीवुडचा जुना प्रोड्यूसर. ज्याचं ते जुनं पडीक थिएटर ‘मयसभा’! परमेश्वर खन्ना बरीच वर्ष या थिएटरमध्ये आपला भूतकाळ, बरीच गुपित आणि ४० किलो सोनं घेऊन जगतोय जे कुठे आहे हे त्याच्याशिवाय कोणालाच माहिती नाही. तिथे त्याच्यासोबत त्याचा मुलगा वसू सुद्धा राहतो. मग या थिएटरमध्ये एंट्री होते रावराणा आणि झीनत यांची जे सोन्याच्या हव्यासापाई तिथे आलेत. 

================================

हे देखील वाचा : हमाली करणाऱ्या Roshan Bhajankarने कष्टाचे दिवस काढले; नशीबाने थेट उघडलं बिग बॉसच्या घराचं दार

================================

खजिना, लालसा आणि माणसाचा विक्षिप्त चेहरा या सगळ्याचा एक ‘जहरी’ कॉकटेल म्हणजे मयसभा. फक्त चार पात्रांवर हा डोलारा उभा करायचा म्हणजे परफॉर्मन्स सुद्धा तितकाच दमदार पाहिजे… आणि ही या चित्रपटाची सर्वात स्ट्रॉंग बाजू आहे. जावेद जाफरींचा हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात कडक परफॉर्मन्स आहे. त्यांना असा रोल कधी ऑफर केलाच गेला नाही. त्यामुळे या माणसात कीती क्षमता आहे हे आपल्याला कधी कळालंच नाही. देहबोली पासून ते तो आवाज… अंगावर काटे!

तुम्हाला वाटणारच नाही की हा माणूस तकेशीस् कॅसलला आवाज द्यायचा. चित्रपट संपल्यानंतर तुमच्या डोक्यात जावेद जाफरींनी उभा केलेला परमेश्वर खन्ना फिरत राहील. जेवढं पिशाच्चमय काम केलंय तेवढंच निरागस काम मोहम्मद समादने ते थिएटर आणि त्याचा बाप हेच जग होऊन बसलंय. या जगात पहिल्यांदा येतो तो म्हणजे रावराणा जो दीपक दामले यांनी साकारला आहे. तुंबाड मधला त्यांनी सकरलेला लालची राघव सोन्यासाठी जितका हापापलेला असतो तितकाच रावराणा सुद्धा आहे.

या सगळ्यात आणखी एक पात्र म्हणजे झीनत जे वीणा जामकर ने साकारलय आणि खूप अचाट काम केलंय प्रत्येक intention मागे तिचा एक चेहरा आहे एक स्माइल आहे. जी तुम्हाला आणखी मयसभेत खेचते. या चारही जणांमुळे हे भयाण जग जीवंत झालंय…यात आणखी तीन पात्र आहेत ते म्हणजे अंधार, धूर आणि ते theater.

राहीने कोणतंही भारी भरभक्कम VFX न वापरता, फक्त अंधार धूरा आणि कॅमेरा अँगलच्या जोरावर असं वातावरण तयार केलंय जे तुमच्या मेंदूत धिंगाणा घालत राहतं. राही बर्वे व्हिज्युअल मास्टर आहे. तो प्रत्येक फ्रेम एखाद्या चित्रासारखी तुमच्या समोर मांडतो. त्यासाठी सिनेमॅटोग्राफरचही कौतुक कारण एकाच भव्य जुनाट थिएटरमध्ये चित्रपट घडत असला तरी कुठेच तुम्हाला फ्रेम सारखी वाटत नाही. या चित्रपटाचं साउंड डिझाईन सुद्धा कमाल आहे पडद्यावरचा प्रत्येक आवाज तुम्हाला मयसभेत खेचून घेतो.

================================

हे देखील वाचा : Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी आलेला ‘हा’ चित्रपट ठरला ऑल टाईम ब्लॉकबस्टर…

================================

काही लोकांना चित्रपटाची ‘ट्रीटमेंट सुरुवातीला स्लो वाटेल पण मयसभा हा एक सावकाश चढणारा नशा आहे आणि त्याची मजा त्यातच आहे. हे लेखक दिग्दर्शक राही अनिल बर्वेला परफेक्ट माहितीये. तुंबाडला डोक्यात ठेवून हा चित्रपट पाहू नका… तुंबाड’चे निकष बाजूला सारून गेलात, तर हा एक मास्टरपीस आहे.

थोडक्यात सांगायचं तर… ‘मयसभा’ लुभावणारा आहे, मनमोहक आहे, फसवा आहे.. पण खरा आहे. यात एकदा शिरलात की बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरत नाही. Climax पाहून तुम्ही थक्क व्हाल. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला अनेक प्रश्न पडतील, तुम्ही अस्वस्थ व्हाल पण हा अनुभव तुम्ही विसरणार नाही. त्यामुळेच हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच पाहा!

कलाकृती मिडिया मयसभा चित्रपटाला ५ पैकी देत आहेत ४.५ स्टार्स! 

-सुशांत अभंग

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywlld Entertainment News javed jafri mayasabha rahi anil barve tumbaad
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.