हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

आधी कोर्टात खेचण्याची भाषा आता वाढदिवसाच्या शुभेच्छा? Shashank Ketkar च्या पोस्टमुळे चाहतेही गोंधळले…
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा केवळ अभिनयासाठीच नाही, तर त्याच्या स्पष्ट आणि निर्भीड मतांसाठीही ओळखला जातो. जे योग्य वाटत नाही, अन्यायकारक भासते किंवा मनाला खटकते, ते तो कोणताही आडपडदा न ठेवता उघडपणे मांडतो. वैयक्तिक अनुभव असोत वा इंडस्ट्रीतील प्रश्न, शशांक नेहमीच ठाम भूमिका घेताना दिसतो.काही महिन्यांपूर्वी शशांक केतकरने प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी (Mandar Devsthali)यांच्याविरोधात गंभीर आरोप करत मोठी खळबळ उडवली होती. एका मालिकेच्या मानधनाचे पैसे वेळेत न मिळाल्याने त्याने सोशल मीडियावर थेट चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. त्या संवादामध्ये मंदार देवस्थळी यांनी “लवकरच पैसे देईन” असे आश्वासन दिल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र वारंवार दिलेल्या तारखा उलटूनही पैसे न मिळाल्याने शशांकने कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. या प्रकरणानंतर अनेक कलाकारांनीही इंडस्ट्रीतील अशाच अनुभवांवर उघडपणे भाष्य करण्यास सुरुवात केली होती.(Shashank Ketkar)

हा वाद अद्याप पूर्णपणे मिटलेला नसतानाच, शशांक केतकरच्या एका अलीकडील सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. नुकताच मंदार देवस्थळी यांचा वाढदिवस साजरा झाला आणि ज्यांच्यावर काही काळापूर्वी शशांक गंभीर आरोप करत होता, त्याच व्यक्तीसाठी त्याने सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, या शुभेच्छांची पद्धतही तितकीच लक्षवेधी ठरली आहे.

शशांकने मंदार देवस्थळी यांच्यावरील काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला एक जुना वृत्तपत्रातील लेख शेअर केला आहे. त्या लेखात दिग्दर्शकाचा उल्लेख ‘डार्लिंग दिग्दर्शक’ असा करण्यात आला होता. हा लेख शेअर करत शशांकने लिहिले, “तुझ्याबद्दलचा एक जुना आर्टिकल! जग काहीही म्हणो… माझ्यासाठी तू तेव्हाही एक उत्तम दिग्दर्शक होतास आणि आजही आहेस.”शशांकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी त्याच्या मोठ्या मनाचे आणि प्रोफेशनल दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे, तर काहींनी मात्र या पोस्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘मानधनाचा प्रश्न अजून सुटलेला नसताना वाढदिवसाच्या शुभेच्छा का?’ असा सवाल अनेक जण करताना दिसत आहेत.(Shashank Ketkar)
===========================
===========================
उल्लेखनीय बाब म्हणजे, शशांक केतकर आणि मंदार देवस्थळी यांची जोडी पूर्वी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. झी मराठीवरील गाजलेली मालिका ‘होणार सुन मी या घरची’ मंदार देवस्थळी यांनी दिग्दर्शित केली होती आणि याच मालिकेमुळे शशांक केतकर घराघरात पोहोचला. त्यानंतर दोघांनी कलर्स मराठीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतही एकत्र काम केले. मात्र याच प्रोजेक्टच्या मानधनावरून वाद निर्माण झाल्याचे शशांकने उघडपणे सांगितले होते.