Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati

Nirmiti Sawant : ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित; आता रंगणार कौटुंबिक

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

जेव्हा कॉमेडीयन मुक्री अभिनेत्री Nadiraच्या बेडरूममध्ये शिरला होता!

Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ ,

Ramayana चित्रपटाच्या खोट्या कास्टिंगवर भडकला विक्रांत मेस्सी

Mughal-E-Azam : मोहन स्टुडिओत साधं टॉयलेटही नव्हतं….

Valentine’s Week  2026 : ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही बॉलिवूडच्या ‘या’

Gondhal चित्रपटाचा जागतिक डंका; ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Uttar Movie OTT: रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांचा उत्तर आता घरबसल्या पाहता येणार; पाहा कधी आणि कुठे होणार प्रदर्शित! 

 Uttar Movie OTT: रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांचा उत्तर आता घरबसल्या पाहता येणार; पाहा कधी आणि कुठे होणार प्रदर्शित! 
Uttar Marathi Movie on Ott
मिक्स मसाला

Uttar Movie OTT: रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांचा उत्तर आता घरबसल्या पाहता येणार; पाहा कधी आणि कुठे होणार प्रदर्शित! 

by Team KalakrutiMedia 09/02/2026

आई म्हणजे निस्वार्थ प्रेम, शांत आधार आणि नकळत मिळणारी ताकद. आई आणि मुलामधील असंच एक हळवं, समजूतदार आणि आजच्या काळाशी जोडलेलं नातं मांडणारा ‘उत्तर’ (Uttar) हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. रेणुका शहाणे ( Renuka Shahane) आणि अभिनय बेर्डे ( Abhinay Berde) यांच्या प्रमुख भूमिकांमुळे ही कथा अधिकच जिवंत होते. चित्रपटगृहात प्रेक्षकांची मनं जिंकून घेतल्यानंतर आता ‘उत्तर’ झी 5 (Zee 5) मराठीवर ओटीटी माध्यमातून पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येत आहे. वेगवान आयुष्याच्या प्रवासात वेळ कधी हातातून निसटतो, हे कळतही नाही. अशा वेळी जीवन आपल्याकडून काही प्रश्नांची उत्तरं मागतं, जी देण्याची तयारी आपण अनेकदा करत नाही. संयम, संवेदनशीलता आणि भावनिक प्रामाणिकपणाच्या आधारावर ‘उत्तर’ची कथा हळूहळू उलगडत जाते आणि प्रेक्षकांना स्वतःच्या नात्यांकडे पाहायला भाग पाडते.(Uttar Movie on Ott)

Uttar Marathi Movie on Ott
Uttar Marathi Movie on Ott

या चित्रपटात आई आणि मुलामधील नात्याचे सूक्ष्म पदर प्रभावीपणे उलगडले आहेत. उमा ही अशी आई आहे, जिचं मूक प्रेम आणि उबदारपणा कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतो. तर निनाद हा तरुण, आयुष्याच्या धावपळीत स्वतःला सावरत पुढे जाताना नकळत घरापासून दूर सरकत जातो. परिस्थितीला दोष न देता, स्वतःच्या भावनिक संघर्षाशी झुंज देत तो आईसोबतचं अंतर मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

Uttar Marathi Movie on Ott
Uttar Marathi Movie on Ott

क्षितिज पटवर्धन (Kshij Patwardhan) लिखित-दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंट यांच्या निर्मितीत साकारलेला ‘उत्तर’ हा चित्रपट अभिनयाच्या बाबतीतही लक्षवेधी ठरतो. रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांच्या भूमिका अत्यंत संयत आणि परिणामकारक आहेत. त्यांच्यासोबत हृता दुर्गुळे आणि निर्मिती सावंत यांच्या अभिनयामुळे कथेला अधिक भावनिक खोली मिळते. बदलती परिस्थिती, गैरसमज आणि मूक भावना यांमधून प्रेम, क्षमा आणि समजूतदारपणाचा प्रवास या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. चित्रपटाविषयी बोलताना रेणुका शहाणे म्हणाल्या की , “उमा ही व्यक्तिरेखा प्रेम, धैर्य आणि सर्व काही योग्य वेळी जुळून येईल या शांत विश्वासातून घडलेली आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप जवळचं होतं. तिच्या शांततेतही खूप काही बोलण्याची ताकद होती. ‘उत्तर’ आता अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार याचा मला आनंद आहे.”(Uttar Movie on Ott)

===========================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 च्या घरातून Omkar Raut बाहेर; आता घरात होणार मोठे बदल

===========================

अभिनय बेर्डे याने आपल्या भूमिकेबद्दल सांगितले, “निनाद हा सतत पुढे धावणाऱ्या पिढीचं प्रतिबिंब आहे. आयुष्यात पुढे जाताना मागे काय राहून जातं, याचा विचार करण्यासाठी अनेकदा वेळच उरत नाही. ही भूमिका साकारताना महत्त्वाकांक्षा, भावनिक दुरावा आणि घराकडे ओढ या सगळ्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली. ‘उत्तर’ ZEE5 वर येत आहे याचा मला खूप आनंद आहे.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhinay Berde Celebrity Entertainment Marathi Movie Marathi Movie OTT News Renuka Shahane uttar marathi movie Uttar Movie OTT Release Uttar OTT Platform Watch Uttar Online ZEE5 Marathi Movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.