हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत!
मराठी टेलिव्हिजनवरून घराघरात पोहोचलेली ‘गंगुबाई’ म्हणजेच अभिनेत्री निर्मिती सावंत (Nirmiti Sawant). गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांशी घट्ट नातं जोडले आहे. संवेदनशील शिक्षिकेपासून ते ठाम आणि प्रभावी स्त्री व्यक्तिरेखांपर्यंत त्यांनी साकारलेल्या भूमिका कायम लक्षात राहिल्या आहेत. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam) या चित्रपटात त्यांनी साकारलेली शिक्षिकेची भूमिका असो वा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अगं अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई?’ (Aga Aga Sunbai, Kay Mhanta Sasubai?) मधील हटके सासू प्रत्येक भूमिकेत त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे या सिनेमातील त्यांची सासू पारंपरिक चौकटीत अडकलेली नसून प्रेक्षकांना वेगळीच भासली.(Nirmiti Sawant)

आता पुन्हा एकदा निर्मिती सावंत सासूच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत, पण यावेळी अवतार आणखीच भन्नाट आहे. त्यांचा आगामी सिनेमा ‘सुपर डुपर’ (Super Duper) सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यातून संपूर्ण टीमची झलक पाहायला मिळते. या सिनेमात मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील दमदार कलाकारांची फौज आहे. निर्मिती सावंत यांच्यासोबत शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते आणि मुख्य भूमिकेत ललित प्रभाकर ( Lalit Prabhakar) व विदुला चौगुले (Vidula Chougule ) झळकणार आहेत. टीझरमध्ये निर्मिती सावंत नऊवारी साडी, नथ, काळा चष्मा आणि हातात बंदूक अशा पूर्णपणे डॅशिंग लुकमध्ये दिसतात, तर शेवटी ललित प्रभाकरची कडक एन्ट्री लक्ष वेधून घेते.

‘कौटुंबिक महासोहळा’ अशी टॅगलाईन असलेला हा सिनेमा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता कुटुंब, नातेसंबंध आणि भावनांचा उत्सव साजरा करणारा आहे. आपल्या संस्कृतीत कुटुंबाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हीच भावना या सिनेमातून मांडण्यात आली आहे. दिग्दर्शक समीर आशा पाटील (Samir Asha Patil) यांच्या मते, माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत कुटुंबाची भूमिका फार मोलाची असते. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला आपलासा वाटेल असा अनुभव ‘सुपर डुपर’ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (Nirmiti Sawant)
=============================
=============================
3 एप्रिल 2026 रोजी हा धमाकेदार कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यावेळी कुटुंबाची गोष्ट थोड्या वेगळ्या, अधिक मसालेदार आणि मनोरंजक अंदाजात पाहायला मिळणार आहे.