Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati

Nirmiti Sawant : ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित; आता रंगणार कौटुंबिक

नऊवारी, नथ आणि बंदूक…‘Super Duper’ मधून Nirmiti Sawant पुन्हा दिसणार डॅशिंग सासूच्या भुमिकेत! 

जेव्हा कॉमेडीयन मुक्री अभिनेत्री Nadiraच्या बेडरूममध्ये शिरला होता!

Bigg Boss Marathi 6: ‘चल आपण करून टाकू लग्न’ ,

Ramayana चित्रपटाच्या खोट्या कास्टिंगवर भडकला विक्रांत मेस्सी

Mughal-E-Azam : मोहन स्टुडिओत साधं टॉयलेटही नव्हतं….

Valentine’s Week  2026 : ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही बॉलिवूडच्या ‘या’

Gondhal चित्रपटाचा जागतिक डंका; ’फिप्रेस्को’ या मानाच्या अवॉर्डने मराठी कलेचा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati ने जिंकलं महाराष्ट्राचं मन!

 “मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati ने जिंकलं महाराष्ट्राचं मन!
मिक्स मसाला

“मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati ने जिंकलं महाराष्ट्राचं मन!

by रसिका शिंदे-पॉल 10/02/2026

सिनेमाला भाषेचं बंधन नसतं हे वारंवार प्रत्येक कलाकार त्यांच्या कामांमधून सिद्ध करताना दिसत आहेत. बरेच मराठी कलाकार बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीवरही आपली पकड मजबूत करताना दिसत असून काही साऊथ कलाकार बॉलिवूड आणि मराठीतही आपला ऑडियन्स तयार करण्यात्या तयारीत आहेत. बरं तुम्हाला माहित आहे की चित्रपटसृष्टीची सुरुवात मुकपटाने झाली होती आणि आता ‘गांधी टॉक्स’च्या (Gandhi Talks Movie) निमित्ताने २१व्या शतकात एकही संवाद नसणारा चित्रपट एका मराठी दिग्दर्शकानेच आपल्या भेटीला आणला आहे… आणि यात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीने लीड रोल केला असून त्याने मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हणालाय विजय ते जाणून घेऊयात… (Marathi Movies 2026)

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीने ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याविषयी असं म्हटलं की, ‘मी सिद्धार्थसोबत याबद्दल बोललो, त्याने नाटकाबद्दल सांगितलं. मी जेव्हा सिद्धार्थ जाधव आणि किशोर यांच्यासोबत बोललो तेव्हा मला कळलं की, त्यांचं मराठी इंडस्ट्रीवर प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या कामातून हे प्रेम कायम दिसून येतं. मराठी इंडस्ट्रीने बिग प्रोजेक्ट्स तयार करायला हवे. मलासुद्धा मराठी इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा आहे. मी जेव्हा यांच्याबरोबर काम करत होतो, तेव्हा मी यांना मराठी इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली.’ (Siddharth Jadhav and Vijay Sethupati)

पुढे मराठी चित्रपटांबद्दल बोलताना विजय असं देखील म्हणाला की, “मराठीत आणखी मोठमोठे सिनेमे बनले पाहिजेत आणि मलाही मराठी इंडस्ट्रीत काम करायचं आहे. मी त्यांना तसं सांगितलं आहे. मी जास्त चित्रपट पाहिले नाहीत त्यामुळे कोण चांगले दिग्दर्शक आहेत ते मला सांगा त्यांच्याकडून मी स्क्रिप्ट ऐकायला नक्कीच तयार आहे. मी मराठी बोलायचाही प्रयत्न करेन.’, विजयने मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करेन या वाक्यावर त्याने महाराष्ट्राचं मन नक्कीच जिंकलंय. त्यामुळे मराठीत विजय सेतुपतीला काम करताना पाहण्याची उत्सुकता अधिक वाढली यात शंकाच नाही. (Entertainment Trending News)

================================

हे देखील वाचा : Valentine’s Week  2026 : ७ वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने ब्रेकअपनंतर तिच्याच घरासमोरुन काढलेली लग्नाची वरात

================================

दरम्यान,  किशोर बेलेकर दिग्दर्शित गांधी टॉक्स हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. यात साऊथ स्टार विजय सेतुपतीसह सिद्धार्थ जाधव, अदिती राव हैदरी, वनिता खरात, उषा नाडकर्णी असे कलाकार झळकले आहेत. तसेच, येत्या काळात ‘पेड्डी’ (Peddi) आणि ‘के.डी : द देविल’ हे नवे चित्रपट विजय आपल्या भेटीला घेऊन येणार आहे. (Vijay Sethupati Upcoming Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: gandhi talks South films Tollywood vijay sethupati
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.