हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म
बॉलिवूडमध्ये मैत्रीवर आधारित बरेच चित्रपट आले. पण ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ (Zindagi Na Milegi Dobara) हा चित्रपट जरा जास्तच जवळचा वाटतो. ह्रतिक रोशन (Hrithik Roshan), फरहान अख्तर आणि अभय देओल यांची प्रमुख भूमिका असणारा हा एव्हरग्रीन चित्रपट २०११ मध्ये आला होता. आता तब्बल १५ वर्षांनी पुन्हा एकदा हे मैत्रीचं त्रिकूट आपल्याला भेटायला येणार असून जिंदगी ना मिलेगी दोबारा २ चित्रपटाच्या कथेवर काम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागाचंही दिग्दर्शन झोया अख्तरच करणार आहे. (ZNMD 2011)

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटात इमरान-कबीर-अर्जुन हे मैत्रीचं त्रिकुट प्रेक्षकांना खास आवडलं होतं. पुन्हा या ३ मित्रांनी एकत्र यावं अशी बऱ्याच वर्षांची प्रेक्षकांची इच्छा अखेर पुर्ण होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सीक्वलमध्ये पुन्हा इमरान-कबीर-अर्जुन दिसणार आहेत. या सीक्वेलमधून तिघांच्या आयुष्यात पुन्हा डोकावलं जाणार असून एक नवा प्रवास आपल्या समोर आणसा जाणार असल्याची माहिती आहे. बऱ्याच वर्षांनी मित्रांचं आयुष्य कसं सुरु आहे, काय अपडाऊन्स आहेत यावरही भाष्य केलं जाणार आहे. (Zindagi Na Milegi Dobara sequel)
================================
हे देखील वाचा : Ramayana चित्रपटाच्या खोट्या कास्टिंगवर भडकला विक्रांत मेस्सी
================================
काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “झोयाने चित्रपटाची कथा फायनल केली असून ती आनंदी आहे. तिचं नेहमी हेच म्हणणं होतं की ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चा सीक्वेल तेव्हाच होईल जेव्हा काहीतरी नवीन स्टोरी समोर असेल. भूतकाळातील गोष्टींवर हा सिनेमा बनवला जाणार नाही. तीन पुरुषांच्या आयुष्यात झालेला बदल या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे”.. दरम्यान, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, २०११ मध्ये या चित्रपटाने ६० कोटींच्या बजेटमध्ये भारतात ९०.२७ कोटी आणि जगभरात १७० कोटींपर्यंत कमाई केली होती.
दरम्यान, पहिल्या भागात फरहान अख्तर, हृतिक रोशन आणि अभय देओल यांच्याबरोबरच कॅटरिना कैफ, कल्की कोचिन, नसरुद्दीन शाह यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्यामुळे आता कॅटरिना आई झाल्यानंतर पुन्हा या चित्रपटात दिसणार का हे पाहण्यासाठी आता सगळेच उस्तुक आहेत. (Bollywood Upcoming sequels)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi