
Big Boss Marathi Season 6 : टोळीत प्रेमाची खळी खुलणार! रुचिया विशालच्या प्रेमात?
सगळीकडे सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचीच जोरदार चर्चा आहे. प्रेक्षकांकडून सकारात्मक आणि नकारात्मक अशा संमिश्र प्रतिक्रिया सीझनबद्दल आणि स्पर्धकांबद्दल मिळत आहेत. बिग बॉसच्या घरात सध्या दोन गट पडले आहेत. त्यापैकी टोळीतील सदस्य सगळ्यांच्याच नाकी नाऊ आणताना दिसत आहेत. शिवाय, राखी सावंत हिने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत विशालच्या टोळीत फुट पाडण्याचा प्रयत्न केला. विशाल आणि रुचिता एकत्र बसलेले असताना राखीने थेट विशाललाच प्रश्न केला, “तू रुचिताचे पाय का चेपतोस? तुमच्यात काय सुरू आहे? तू माझा मित्र आहेस. इतकंच नाही तर राखीने विशालला रुचितापासून दूर राहण्याचा इशाराही दिला. यानंतर टोळीत प्रेमाची खळी खुलली आहे असं अंदाज एखा व्हिडिओमुळे समोर आला आहे… (Marathi Big Boss Season 6)
तर, झालं असं की, राखीच्य़ा बोलण्यामुळे रुचिता संतापली आणि तिने तु असं बोलू नकोस ते विचित्र वाटतंय असं म्हटलं. त्यावरप राखीने मी तुला नाही तर विशालला माझ्या मित्राला बोलले आहे. घराबाहेर विशाल आणि राखी खूप चांगले मित्र असून घरात राखी आल्यापासून दोघं अनेकदा एकत्र दिसत आहेत. त्यामुळे रुचिताच्या मनात संभ्रम निर्माण झालेला दिसत आहे. (Rakhi Sawant)

अशातच घरातून एक ट्विस्ट आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात टोळीत फूट नाही तर प्रेमाचं गुलाब फुलताना दिसणार आहे. अनुश्री आणि रुचिता एकत्र बसून गप्पा मारत असताना अनुश्रीने थेट रुचिताला प्रश्न विचारला की, “तुला काही फिलिंग्स आहेत विशालसाठी?” या प्रश्नावर मन मोकळं करत रुचिता म्हणाली, “मला त्याचा प्रेझेन्स आवडतो. संपूर्ण घर जेव्हा माझ्या फ्लॉसवर फोकस करतं तेव्हा तो माझ्या पॉझिटिव्ह गोष्टींवर फोकस करतो.” (Ruchita Jamdar and Anushree Mane)

पुढे रुचिता भावूक झाली आणि रडत म्हणाली की, “मी खूप अटॅच्ड आहे. खूप जास्त. कळतंच नाहीये मी काय करू.” रुचिताला भावूक झाल्याचं पाहून अनुश्रीने तिला समजावलं. “रडू नकोस, शांत हो”, असं म्हणत तिने रुचिताला आधार दिला. बिग बॉसचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Vishal Kotian)
================================
================================
आता दरसीझनप्रमाने यंदाच्या सहाव्या सीझनमध्येही विशाल आणि रुचिता यांच्यात प्रेमाची खळी खुलणार का? दोघांनाही सेम भावना असणार की हे एकतर्फी असणार? की हा दोघांचा किंवा दोघांपैकी एकाचा खेळाचा भाग असणार हे लवकरच समोर येईल.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi