अमिताभ बच्चनच्या ‘दोस्ताना’ सिनेमात Starughan Sinha ची एन्ट्री कशी झाली?

बाल्कनीत बसणाऱ्या दोघांचा गेम झाला; Big Boss Marathi Season 6 मधील प्रेमाची कळी खुलण्यापूर्वीच कोमेजली!
दिवसेंदिवस मराठी बिग बॉस सीझन ६ चा टीआरपी वाढत चालला आहे. प्रत्येक स्पर्धक दर आठवड्याला आपला गेम दाखवत आहेत. नुकताच पाचव्या आठवड्यातला भाऊचा धक्का झाला आणि प्रेक्षकांना धक्का बसेल असं एलिमिनेशन घरातून झालं. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून बाल्कनीतून गेम पाहणाऱ्या आणि घरात काहीच सहभाग सांगूनही दाखवणाऱ्या २ स्पर्धकांची एक्झिट झाली. (Marathi Big Boss season 6)
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये पाचव्या आठवड्यात डबल एलिमिनेशन झालं असून करण सोनावणे आणि आयुष संजीव यांचा घरातला प्रवास संपला. पहिल्या दिवसापासून खरं तर घरातील सदस्य आणि रितेश भाऊ दोघांनाही आपला गेम दाखवा असं सांगत असतानाही त्यांनी गांभीर्याने कुणाचं ऐकलं नाही आणि परिणामी त्यांना घराबाहेर जावं लागलं. (Karan Sonawane & Ayush Sanjeev)

आयुष संजीव याची तब्येत काही दिवसांपासून ठिक नसल्यामुळे त्याची एक्झिट झाल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, आता कुठे जरा करण त्याचा गेम दाखवत होता आणि महत्वाचं म्हणजे प्राजक्ता शुक्रे सोबत त्याची लव्हस्टोरी हळूहळू खुलत होती, मात्र त्याआधीच त्याचा दि एण्ड झाला आहे. आता घरात तरी ही प्रेमाची कळी खुलली नसली तरी घराबाहेर करण आणि प्राजक्ता यांच्यात काही सूर जुळणार का हे जाणून घेण्याची सगळ्यांची उस्तुकता आहे. (Karan Sonawane & Prajakta Shukre)
================================
हे देखील वाचा : Shahid Kapoor : “मला मराठीत काम करण्याची संधी मिळाली तर…”
================================
तसेच, करण, आयुष आणि सचिन यांच्यापैकी सचिन या आठवड्यात सेफ झाले असून आत ते त्यांचा गेम कसा पालटणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसेच, घरात राखी सावंत (Rakhi Sawant) आल्यामुळे आता नव्या आठवड्यात काय राडे होणार हे देखील पाहण्याची उत्सुकता नक्कीच सगळ्यांना लागली आहे. (Riteish Deshmukh)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi