Apurva Nemlekar Wedding: अपूर्वा नेमळेकरचा जीवनसाथी तनुज गोवळकर नेमका आहे

Apurva Nemlekar हिने व्हेलेंटाईनच्या दिवशीच बांधली लग्नगाठ; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज!
मराठी मालिकाविश्वात खलनायिका म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता आता लग्नबंधनात अडकली आहे. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी तिने आपल्या जोडीदारासोबत सात फेरे घेत नव्या आय़ुष्याच्या प्रवासाची सुरुवात केली आहे. सोशल मिडियावर तिने लग्नाचे फोचो शेअर केले असून कलाकारांसह तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (Apurva Nemlekar Marriage Photos)

दरम्यान, अपुर्वाने इन्स्टाग्रामवर लग्नाच्या फोटोसोबत एक पोस्ट देखील लिहिली आहे. ती म्हणते की १४ फेब्रुवारी २०२६ — एक अशी तारीख जी कायमची आमची झाली. काल प्रेम, विश्वास आणि आमच्या जवळच्या व्यक्तींच्या आशीर्वादांनी, आम्ही आमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय एकत्र सुरू केला आहे. माझ्या मनातील अपार कृतज्ञतेसह, मला हे सांगण्यास आनंद होत आहे की मी आता श्रीमती अपूर्वा तनुज गोवळकर आहे’. (Marathi Entertainment News)

पुढे तिने असं देखील लिहिलं आहे की, ‘आयुष्याने माझी बरेचदा परीक्षा घेतली आहे, मला आकार दिला आहे, मी तुटले आणि पुन्हा जोडली गेले. तरीही, मी प्रेमावर विश्वास ठेवणे कधीही थांबवले नाही. आयुष्यातल्या बऱ्याच वादळांनंतर, देवाने मला शांती दिली. सर्व प्रतीक्षेनंतर, त्याने मला सहवास दिला आणि व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच माझ्या प्रेमाला त्याचे प्रेमाला घर सापडले. ही आमची दुसरी सुरुवात आहे – परिपक्वता, समजूतदारपणा आणि एकमेकांबद्दल खोल आदराने आम्ही एकमेकांना निवडले. आम्ही पूर्ण मनाने आणि हात जोडून या प्रवासात पाऊल ठेवतो, तुमचे आशीर्वाद, प्रेम आणि शुभेच्छा मागतो कारण आम्ही एकत्र आयुष्य घडवणार आहोत. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात माझ्यासोबत उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. आज, मी पूर्ण, कृतज्ञ आणि खूप आनंदी आहे’.
प्रेम,
श्रीमती अपूर्वा तनुज गोवळकर (Apurva Nemlekar Instagram)
================================
================================
अपुर्वा नेमळेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ‘आभास’ या मालिकेतून तिने मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. पुढे, ‘रात्रीस खेळ चाले’ मधील शेवंता या पात्राने तिला विशेष ओळख मिळाली. त्यानंतर, मराठी बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती आणि ती 1st Runner Up देखील ठरली. पुढे, स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सावनी या भूमिकेत दिसली. सध्या ती ‘शुभ विवाह’ या मालिकेत पोलिसांची भूमिका साकारत आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi