
Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT: कार्तिक-अनन्याचा ‘तू मेरी मैं तेरा’ OTT वर रिलीज; जाणून घ्या डिटेल्स!
तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी (Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri) हा कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि अनन्या पांडे (Ananaya Pande ) यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर २५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. थिएटरमध्ये या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. छायांकन आणि हलक्याफुलक्या सादरीकरणाचे विशेष कौतुक झाले, मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपट अपेक्षित कामगिरी करू शकला नाही.आता मात्र ही प्रेमकथा OTT वर इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे.(Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT)

हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२६ पासून Amazon Prime Video वर स्ट्रिमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी तो रेंटवर उपलब्ध होता, पण आता प्रेक्षकांना तो मोफत पाहता येणार आहे.चित्रपटाची कथा आजच्या काळातील आधुनिक नातेसंबंधांवर आधारित आहे. कार्तिक आर्यनने साकारलेला ‘रे’ (रेहान) हा व्यावसायिक वेडिंग प्लॅनर असतो, तर अनन्या पांडे ‘रूमी वर्धन सिंग’च्या भूमिकेत दिसते. सुरुवातीला दोघांमध्ये थोडा संकोच आणि मतभेद दिसून येतात.

मात्र, वेळ जसजसा पुढे सरकतो तसतसा संवाद वाढतो आणि दोघांमध्ये प्रेमाची नाजूक भावना निर्माण होते.कथेत एक भावनिक वळण तेव्हा येते, जेव्हा रूमीच्या वडिलांची प्रकृती बिघडते. त्या कठीण प्रसंगी रे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. या प्रसंगानंतर त्यांच्या नात्याची घट्ट वीण अधिक दृढ होते.या चित्रपटात नीना गुप्ता, जॅकी श्रॉफ, चांदनी भाभ्रा, टिकू तलसानिया, ग्रुशा कपूर, लोकेश मित्तल आणि गौरव पांडे यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.(Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT)
===========================
===========================
चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले असून कथा-लेखन करण श्रीकांत शर्मा यांचे आहे. निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि नमाह पिक्चर्सच्या बॅनरखाली करण जोहर, आदर पूनावाला, अपूर्व मेहता आणि इतर निर्मात्यांनी केली आहे.थिएटरमध्ये अपेक्षित यश न मिळालेला हा चित्रपट आता OTT प्रेक्षकांची मनं जिंकतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हलक्याफुलक्या आणि भावनिक प्रेमकथांचा आनंद घेणाऱ्यांसाठी हा चित्रपट एक चांगला पर्याय ठरू शकतो.