
Jeetendra : “मराठी बोलता येत होतं म्हणूनच मी अॅक्टर झालो”
बॉलिवूडचे सुपसस्टार जितेंद्र (Jeetendra) जरी हिंदीत काम करत असले तरी ते मनाने मराठीच आहेत. बॉलिवूडमधला हॅण्डसम हिरो म्हणून त्यांची ओळख होती आणि आजही ती कायम आहे. बऱ्याच पुरस्कार सोहळ्यांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी ते मराठीत बोलताना दिसतात. आज त्यांनी जे कायी यश मिळवलं आहे त्याचं क्रेडिट ते मराठी भाषेला कायम देत असतात. इतकंच नाही तर बालपणी ज्या गिरगावच्या चाळीत ते राहायला होते तेथील आठवणींना उजाळा ते देतात. अशातच सध्या सोशल मिडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात त्यांनी मराठी भाषा मला बोलता येत होती म्हणूनच मी अॅक्टर झालो अशी कबूली दिली आहे. नेमकी ते काय म्हणाले जाणून घेऊयात… (Bollywood)
प्रणाली कदम या इन्फ्लुएन्सरला दिलेल्या एका मुलाखतीत जितेंद्र यांनी त्यांच्या मराठी भाषेवरील प्रेमाबद्दल पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “मी पंजाबी आणि पण गिरगावात राहून मराठी बोलायचो. त्यावेळी मला पंजाबी येत नव्हती. आणि खरं सांगायचं तर मला मराठी येतं म्हणून मी अभिनेता झालो. शांताराम बापूंकडे मी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत होतो. त्यांना कौतुक वाटायचं की हा पंजाबी असून इतकी चांगली मराठी कशी बोलतो? पण कसं आहे ना माकड कितीही म्हातारा झाला तरी तो उडी मारायला विसरत नाही”… (Jeetendra & Marathi Language)

दरम्यान, जितेंद्र यांचं बालपण गिरगावच्या चाळीत गेलं. आजही ते कधीतरी तिथे जातात आणि आपल्या जुन्या आठवणींच रमतात. तरुणींना आपल्या अभिनय, रुप आणि डान्सने घायाळ करणारे जितेंद्र १९ वर्षांचे होईपर्यंत गिरगावच्या चाळीत राहायला होते. आजूबाजूला मराठी बिऱ्हाडं राहायला असल्यामुळे त्यांची मराठी भाषेवर मजबूत पकड होती. बऱ्याच मुलाखतीत त्यांनी चाळीच्या जीवनाबद्दल भाष्य केलं होतं. (Jeetendra and Chawl in Girgoan)

एकदा एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र म्हणाले होते की, “मी गिरगावात चाळीत मराठी माणसांमध्ये मोठा झालो. त्याकाळी माझ्या शेजारी मोठ्या प्रमाणात मराठी लोकं राहायचे. माझ्या काळातील मराठी लोकांबद्दल मी बोलतोय. खूप चांगली लोकं होती ती. त्या काळी लबाड हा शब्दही वाईट समजला जायचा. आजकाल आपण ऐकतो तेव्हा तो फार सामान्य वाटतो. पण त्याकाळी कोणी लबाड म्हटलं की वाईट वाटायचं. तेव्हाच्या मराठी लोकांमध्ये हावरटपणा नव्हता. जवळ जे काही होतं ते स्वतः मिळवल्याचा आनंद होता. त्यात ते खुश होते. मी आताही त्या लोकांना शोधत असतो. अशा मराठी माणसांना शोधत असतो. इतके चांगले मराठी लोक होते ते”… (Bollywood)
================================
================================
दरम्यान, जितेंद्र यांचा चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी २०० पेक्षा अधिक चित्रपाटांत कामं केली. ‘परिचय’, ‘तोहफा’, ‘हिम्मतवाला’, ‘कारवां’, ‘मकसद’, ‘स्वर्ग से सूर’, ‘धरती कहे पुकारे’, ‘खुदगर्ज’, ‘ठाणेदार’, ‘धरमवीर’, ‘स्वर्ग नरक’, ‘उधार का सिंदूर’ यांसारखे हिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. (Movies of Jeetendra)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi