Shah Rukh Khan च्या ‘रावण’चा 15 वर्षांनंतर सिक्वेल येणार? दिग्दर्शकांनी

ज्याने खळखळून हसवलं, तोच मराठी अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावर पोस्ट लिहीत व्यक्त केल्या भावना…
मनोरंजनविश्व हे बाहेरून जितकं झगमगाटी आणि आकर्षक दिसतं, तितकंच आतून ते भावनिक चढउतारांनी भरलेलं असतं. यश, प्रसिद्धी, चाहत्यांचं प्रेम हे सगळं मिळूनही अनेक सेलिब्रिटींना मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागतो. प्रकाशझोतात असलेलं आयुष्य कधी कधी एकटेपण, अपेक्षांचा दबाव आणि सतत परफॉर्म करण्याची जबाबदारी घेऊन येतं. असाच एक प्रसंग सध्या चर्चेत आला आहे. ज्याने आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं, रंगमंच आणि पडद्यावर ऊर्जा ओतली त्या कलाकाराने स्वतःच्या मनातील वेदना व्यक्त केल्या आणि अनेकांना भावूक केलं.(Priyadarshan Jadhav)

मराठी सिनेविश्वातील नावाजलेला अभिनेता म्हणजे प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav). आपल्या नैसर्गिक विनोदबुद्धीने आणि सहज अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. विशेषतः लोकप्रिय विनोदी कार्यक्रम चला हवा येऊ द्या मधील त्यांच्या भूमिकांमुळे ते घराघरात पोहोचले. त्याचबरोबर विविध मालिका, नाटकं आणि चित्रपटांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. रंगमंचावर असो किंवा पडद्यावर प्रियदर्शनची उपस्थिती म्हणजे हमखास हास्याची मेजवानी! मात्र, नुकत्याच त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने चाहत्यांना विचार करायला भाग पाडलं. त्या पोस्टमध्ये त्यांनी मानसिक ताण, भावनिक संघर्ष आणि आयुष्यातील काही कठीण टप्प्यांचा उल्लेख केला. “नेहमी हसवणारा माणूसही आतून तुटू शकतो,” अशी जाणीव त्यांच्या शब्दांतून स्पष्ट होत होती.

अमेरिकेतला फोटो पोस्ट करत प्रियदर्शनने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ”गेले 6 ते 8 महिन्यांपासून मी काहीसा मानसिक ताण तणावात होतो. हे दिवस माझ्यासाठी कठीण होते. नवं प्रोजेक्ट म्हणावं असं काहीच नव्हतं. नवीन काम हाती नव्हतं. नवीन चित्रपट, नाटक किंवा टेलिव्हिजन प्रोजेक्ट काहीच नव्हतं. रिकामी डोकंम माणसाला अतिविचार करायला भाग पाडतं. आणि नको नको त्या विचारांनी मी ग्रासलो होतो. कामांचे प्रोजेक्ट्स आणि रिलीज सतत पुढे ढकलले जात होते. ही वेळ म्हणजे माझ्या संयमाची परिक्षा होती. एकट्यात राहत होतो ,लोकांपासून दूर पळत होतो. कधी खूप आनंदी वाटायचं, तर कधी वैयक्तिक आयुष्यात खूप असुरक्षित वाटायचं. स्वभाव चिडचिडा झाला होता. येणारा प्रत्येक दिवस अर्थहिन वाटायचा. यासगळ्यात तर शांत झोप काय असते ते विसरलोच होतो. या नैराश्याच्या अंधारात आशेचा किरण सापडला ते अमेरिकेच्य़ा दौऱ्यामुळे. अमेरिकेचा दौरा माझ्यासाठी एक आशीर्वाद ठरला. हा फोटो लास वेगासमध्ये काढलेला आहे. मी पूर्ण रात्र कॅसिनोमध्ये जागाच होतो. माझं नशीब अनुभवत होतो आणि आश्चर्य म्हणजे मी 203 डॉलर जिंकले! ते पैसे घेतले आणि आम्ही सगळे मिळून ॲरिझोनातील ग्रँड कॅनियनला गेलो आणि खूप छान वेळ घालवला.कधी कधी आयुष्यातील वादळी काळात विनोद अशक्य गोष्टींवरही मात करू शकतो. प्रेम कोणत्याही संकटातून आपल्याला पार नेऊ शकतं. वाईट नशीब मोठा आवाज करतं, पण शहाणपणाला कधी शांतपणे कधी नमतं घ्यायचं हे माहित असतं. मला आशा आहे की सगळं काही ठीक होईल. अशा शब्दात अभिनेता प्रियदर्शन जाधव सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त झाला आहे. (Priyadarshan Jadhav)
=============================
हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6: विशालने दिला रुचिताला धोका? आता रुचिताने घेतला मोठा निर्णय…
=============================
त्यांच्या या प्रामाणिक कबुलीमुळे अनेक चाहत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. सोशल मीडियावर त्यांच्यासाठी प्रार्थना, सकारात्मक संदेश आणि प्रेमाचा वर्षाव होताना दिसला. अनेकांनी त्यांच्या धैर्याचं कौतुक करत मानसिक आरोग्याविषयी उघडपणे बोलण्याची गरज अधोरेखित केली. आजच्या काळात मानसिक आरोग्य हा अतिशय महत्त्वाचा विषय बनला आहे. कलाकार असो वा सामान्य व्यक्ती प्रत्येकालाच कधी ना कधी तणावाचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी आपल्या भावना व्यक्त करणं, मदत मागणं आणि स्वतःची काळजी घेणं अत्यावश्यक आहे.