Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Shah Rukh Khan च्या ‘रावण’चा 15 वर्षांनंतर सिक्वेल येणार? दिग्दर्शकांनी

ज्याने खळखळून हसवलं, तोच मराठी अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावर पोस्ट

Sholay थांबला नाही, थांबणारही नाही…. 

Jeetendra : “मराठी बोलता येत होतं म्हणूनच मी अॅक्टर झालो”

करा हो लगीनघाई! Vijay Devarkonda याचं घर फुलांनी सजलं

‘सारी सारी रात तेरी याद सताये..’ हे Roshan यांचे गाणे

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT: कार्तिक-अनन्याचा ‘तू

Bigg Boss Marathi 6: विशालने दिला रुचिताला धोका? आता रुचिताने

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Shah Rukh Khan च्या ‘रावण’चा 15 वर्षांनंतर सिक्वेल येणार? दिग्दर्शकांनी स्वतः केला खुलासा

 Shah Rukh Khan च्या ‘रावण’चा 15 वर्षांनंतर सिक्वेल येणार? दिग्दर्शकांनी स्वतः केला खुलासा
Shah Rukh Khan Ra-One 2
मिक्स मसाला

Shah Rukh Khan च्या ‘रावण’चा 15 वर्षांनंतर सिक्वेल येणार? दिग्दर्शकांनी स्वतः केला खुलासा

by Team KalakrutiMedia 20/02/2026

२०११ साली प्रदर्शित झालेला Ra.One हा शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा साय-फाय सुपरहिरो चित्रपट आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. त्या काळात भारतीय सिनेमात एवढ्या मोठ्या प्रमाणावर VFX चा वापर क्वचितच पाहायला मिळत होता. ‘रावन’ने तांत्रिकदृष्ट्या एक नवा मापदंड निर्माण केला होता.या चित्रपटात Kareena Kapoor आणि Arjun Rampal यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. अ‍ॅक्शन, इमोशन आणि जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्स यांच्या जोरावर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ घातली. विशेष म्हणजे, १५ वर्षांनंतरही या चित्रपटातील VFX आणि सुपरहिरो कॉन्सेप्टची चर्चा होताना दिसते. (Shah Rukh Khan Ra-One)

Shah Rukh Khan Ra-One
Ra-One 2

गेल्या काही महिन्यांपासून ‘रावन’बाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. दिग्दर्शक Anubhav Sinha यांना अनेकदा सिक्वेलबद्दल प्रश्न विचारले गेले. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांनाही ‘रावन २’ करण्याची इच्छा आहे. मात्र, असा भव्य प्रकल्प साकारण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागेल. त्यांनी असंही नमूद केलं की, इतका मोठा वेळ देताना योग्य नियोजन आणि कलाकारांची उपलब्धता महत्त्वाची ठरेल. विशेषतः शाहरुख खानसारखा सुपरस्टार अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असताना वेळ जुळवणं हे मोठं आव्हान ठरू शकतं.

Shah Rukh Khan Ra-One 2

२०२५ मध्ये आपल्या ६०व्या वाढदिवसानिमित्त शाहरुख खाननेही ‘रावन २’बद्दल भाष्य केलं होतं. त्याने सांगितलं की, जर अनुभव सिन्हा पुन्हा हा प्रकल्प हाती घेण्यास तयार असतील आणि योग्य वेळ मिळाला, तर सिक्वेल शक्य आहे. तंत्रज्ञान आज अधिक प्रगत झाल्यामुळे आता हा चित्रपट अधिक प्रभावीपणे साकारता येईल, असंही त्याचं मत आहे. दरम्यान, शाहरुख खान सध्या आपल्या आगामी चित्रपट King च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. (Shah Rukh Khan Ra-One)

============================

हे देखील वाचा: Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT: कार्तिक-अनन्याचा ‘तू मेरी मैं तेरा’ OTT वर रिलीज; जाणून घ्या डिटेल्स!

============================

या चित्रपटात त्याच्यासोबत Suhana Khan, Abhishek Bachchan, Deepika Padukone, Rani Mukerji आणि Anil Kapoor यांसारखी दमदार स्टारकास्ट दिसणार आहे. एकीकडे ‘किंग’ची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, दुसरीकडे ‘रावण २’च्या चर्चेमुळे चाहत्यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. आता खरोखरच हा सुपरहिरो पुन्हा पडद्यावर झळकणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.  

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anubhav Sinha Bollywood blockbuster Bollywood sci fi movie Bollywood sequel news bollywood update Celebrity Entertainment Hindi movie updates King movie 2026 Ra.One 15 years Ra.One 2 Ra.One sequel Ra.One VFX shah Rukh Khan shah rukh khan movies SRK upcoming movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.