
Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार नाही”; रुचिताने वेळीच विशालला रोखलं
बिग बॉस मराठीचा सहावा सीझनमध्ये अखेर सहाव्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क झाला आणि ज्या सदस्याला पहिल्या दिवसापासून कॅप्टन व्हायचं होतं त्या स्पर्धकाचं स्वप्न पूर्ण झालं. एकीकडे घरात टास्कची झटापट सुरु होती तर दुसरीकडे विशाल आणि रुचिता यांच्यात एक वेगळाच ट्रॅक सुरु आहे. रुचिताने तिला विशाल आवडतो ही कबूली दिली होती आणि आता विशालनेही त्याला रुचिता आवडत असल्याचं बोलल्यामुळे रान मोकळं झाल्यासारखं झालं आहे. पण या सगळ्यात विशालने जरा त्याच्या मर्यादा ओलांडल्याचं दिसून आलं. यावरु रुचिताने त्याला सक्त ताकिद दिली आहे. नेमकं ती काय म्हणाली आणि टास्कमध्ये काय झालं जाणून घेऊयात… (Big Boss Marathi Season 6)
तर, सहाव्या आठवड्यात कॅप्टन्सीचे उमेदवार होते दीपाली सय्यद, तन्वी कोलते आणि सचिन कुमावत. या तिघांनाही घरात लपवलेल्या चाव्या शोधून त्याची योग्य कुलूपं उघडायची होती. चार फेऱ्यांमध्ये झालेल्या या टास्कमध्ये अखेर काटा ग्रुपच्या तन्वीने कॅप्टन्सी पटकावली आणि घराचा ताबा मिळवला. एकीकडे काटा ग्रुप तिच्या कॅप्टन झाल्यामुळे आनंदात होते तर दुसरीकडे रुचिताची फार चिडडिच होत होती. (Captain Tanvi Kolte)

अशातच, विशाल रुचिताला समजावत होता की इतकं काही झालं नाही आहे उलट सचिन झाला नाही ते बरं झालं कारण आपल्यापेक्षा त्याचा स्ट्रॉंग गेम आपल्याला होऊ द्यायचा नाही. त्यांचं हे बोलणं सुरु असताना विशाल रुचिताला म्हणतो, ‘माझे ओठ किती सेक्सी दिसतायत, किस नाही केलं बरेच दिवस’ पुढे रुचिता विशालला म्हणते, ‘मला फक्त एवढंचं म्हणायचंय माझ्या आई-बाबांना नाही आवडणार. मी जेव्हा तुला बोलेन शांत बस, तेव्हा तू नको बोलूस. हेच मला तुला समजवायचं आहे. कारण एक्सेप्टन्सपर्यंत मी कशी तरी हँडल करेन पण, ओव्हर द बोर्ड जातंय ना. मला ते नकोय,’ असं अनुश्री देखील रुचिताला समजावते. (Vishal kotian & Ruchita Jamdar)
================================
हे देखील वाचा : करा हो लगीनघाई! Vijay Devarkonda याचं घर फुलांनी सजलं
================================

तर दुसरीकडे राकेश आणि राखी रुचिता आणि विशाल विरोधात कट रचत असतात. राकेश असं म्हणतो की, मी रुचितासोबत उद्या बसून गेम प्लॅन करतो आणि ते बघून नक्कीच विशालचा जळफळाट होईल. ठरल्याप्रमाणे रुचिता आणि राकेश बोलत असताना विशालचं पूर्ण लक्ष त्यांच्याकडेच असतं. त्यांचं बोलणं झाल्यानंतर अनुश्री आणि विशाल रुचिताला तो काय बोलत होता हे विचारतात त्यावर रुचिता त्यांना उगाच फिरवून गोष्टी सांगते. आता भाऊच्या धक्क्यावर राकेश आणि रुचिताचं खरं बोलणं घरच्यांसमोर आणि विशाल समोर येणार का? आणि जर का आलं तर त्यावर विशालची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Entertainment marathi News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi