
हाती समशेर अन् चेहऱ्यावर शिवरुप तेज; Raja Shivaji तील रितेश देशमुखचा पहिला लूक रिव्हील
बऱ्याच महिन्यांपासून ज्या चित्रपटाची चर्चा सुरु होती तो मराठीतील पहिला बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) मे महिन्यात रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करणार असून या चित्रपटात तोच शिवरायांची भूमिका देखील साकारणार आहे. आणि आता शिवजयंतीच्या निमित्ताने राजा शिवाजी चित्रपटातील छत्रपतींच्या भूमिकेतील त्याचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. पोस्टरवरील रितेश देशमुखचा लूक अगदी लक्षवेधी आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत आजवर छत्रपतींचा दैदिप्यमान इतिहास सांगणाऱ्या बऱ्याच कलाकृती आल्या. आणि यात आणखी एक भर म्हणून मराठीतील सर्वाधिक बजेट असणारा ‘राजा शिवाजी’ चित्रपट आफल्या भेटीला येणार आहे. रितेशच याच छत्रपतींची भूमिका साकारणार हे फिक्स झालं होतं पण तो नेमकी कसा दिसणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. आणि आता त्यांची प्रतिक्षा संपली असून ‘राजा शिवाजी’तील त्याला पहिला लूक रिव्हील केला असून प्रेक्षक आणि कलाकार मंडळी देखील अवाक् झाले आहेत.(Chhatrapati Shivaji Maharaj)

रितेश देशमुखने ही पोस्ट सोशल मिडियावर शेअक करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आज तोच दिवस आहे, जेव्हा पहिल्यांदा अंधाराला एका प्रकाशाचं स्वप्न पडलं. इतिहासानं जेव्हा भविष्याकडे पाऊल उचलले. याच दिवशी आपल्या मातीला नवा स्वाभिमान मिळाला. शिवजयंतीच्या शुभ प्रसंगी जीओ स्टुडिओज, मुंबई फिल्म कंपनी सादर करीत आहोत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत ‘राजा शिवाजी’ या भव्य सिनेमाचं पहिलं पोस्टर. आपला राजा, आपला अभिमान’. (Riteish Deshmukh)
================================
================================
रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी चित्रपटात रितेश देशमुखसह अभिषेक बच्चन, संजय दत्त, जेनेलिया देशमुख यांच्यासह इतर दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दमदार कलाकारांमुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांसाठी अद्भूत अनुभव देणारा ठरेल. २०२२ मध्ये वेड चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने आपल्या दिग्दर्शनाचा प्रवास सुरु केला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. आणि आता राजा शिवाजी चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कल्ला करणार हे फिक्स आहे. (Marathi Movie 2026)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marath