Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Shah Rukh Khan च्या ‘रावण’चा 15 वर्षांनंतर सिक्वेल येणार? दिग्दर्शकांनी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका; भारतीय चित्रपटसृष्टीत येत्या काळात बदल घडणार?

 Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका; भारतीय चित्रपटसृष्टीत येत्या काळात बदल घडणार?
कलाकृती विशेष

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका; भारतीय चित्रपटसृष्टीत येत्या काळात बदल घडणार?

by रसिका शिंदे-पॉल 21/02/2026

२०२५ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीने गाजवलं. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने २०२५ची जोरदार सुरुवात केली. ६०० कोटींचा टप्पा गाठत विकी कौशलच्या करिअरमधला हा बेस्ट चित्रपट ठरला. त्यानंतर ‘कांतारा २’, ‘रेड २’, ‘जॉली एल एल बी ३’ अशा हिंदी आणि साऊथ चित्रपटांनी प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं… पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? या प्रत्येक चित्रपटात चर्चा झाली ती नायकाची आणि दिग्दर्शकांची… वर उल्लेख केलेल्या एकाही चित्रपटाचं दिग्दर्शन फिमेल डिरेक्टरने केलं नव्हतं… पण २०२६ हे वर्ष वेगळं ठरणार आहे… जानेवारीत राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असणारा ‘मर्दानी ३’ (Mardaani 3) आधीच रिलीज होऊन त्याने फिमेलओरियेन्टेड चित्रपटांची सुरुवात केली आहेच आणि आता ४ पुरुष दिग्दर्शकांच्या बिग बजेट चित्रपटांसमोर एक फिमेल डिरेक्टर उभी ठाकणार आहे. (Indian Cinema)

२०२६ आणि २०२७ या वर्षात हिंदी आणि साऊथमधील सुपस्टार कलाकारांचे बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत. यात आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ (Dhurandhar 2), नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayana), संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ (SPirit), एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘वाराणसी’ (Varanasi) आणि गीतू मोहनदास दिग्दर्शित ‘टॉक्सिक’ (Toxic : A Fairy Tale For Grown-ups) या चित्रपटांचा यात समावेश आहे… या ४ पुरुष दिग्दर्शकांच्या या मोठ्या चित्रपटांसमोर ‘टॉक्सिक’ सारखा बोल्ड विषय एक स्त्री दिग्दर्शिका सादर करणार आहे.. KGF फेम यश या चित्रपटाचा प्रमख नायक असून या चित्रपटाच्या टीझरमधील अत्यंत बोल्ड सीनवरुन हा चित्रपट एका वेगळ्याच दर्जाचा असणार याचा अंदाज आला आहे… खरं तर Viloence आणि एस्कस्ट्रीम बोल्ड सीन्स असणाऱे चित्रपट आजवर पुरुष दिग्दर्शकांनीच सादर केले… परंतु, आता गीतू ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या दिग्दर्शनातून ती चौकट मोडित काढून नवा पायंडा पाडणार हे निश्चित आहे… (Geetu Mohandas)

महत्वाचं म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ चित्रपटासोबत गीतू यांचा ‘टॉक्सिक’ हा चित्रपट क्लॅश होणार आहे… हे दोन्ही चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी रिलीज होणार असून प्रेक्षक आता कोणत्या चित्रपटाला अधिक पसंती देणार हे पाहण्याची उस्तुकता नक्कीच वाढली आहे… २०२५ या वर्षात ‘धुरंधर’ने कमालच केली होती… ८५० कोटी बॉक्स ऑफिसवर पार करत बॉलिवूडचा हा सर्वाधिक कमाई करणारा आणि ८०० कोटी क्लब सुरु करणारा पहिला चित्रपट ठरला… त्यामुळे आता धुरंधर २ कडूनही प्रेक्षकांचा फार अपेक्षा आहेत… (Dhurandhar Box Office Collection)

तर दुसरीकडे, ‘केजीएफ’ चित्रपटामुळे यश याचं जगभरात फॅनफॉलॉइंग वाढलं आहे… आता या यित्रपटात त्याचा कोणता वेगळा अंदाज दिसणार हे पाहण्यासाठी लोकं आतुर आहेत… तसेच, २०२६ मध्ये ‘टॉक्सिक’ नंतर त्याचा ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटही रिलीज होणार असून या नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात यश (Yash) रावणाची भूमिका साकारणार आहे… बॉलिवूडमधला हा सर्वाधिक बजेट असणारा पहिला चित्रपट असून जवळपास ४००० कोटी इतकं याच बजेट असल्याचं सांगितलं जात आहे… तसेच, ‘रामायण’ हा यश याचा बॉलिवूड डेब्यु देखील असणार आहे… (Nitesh Tiwari’s Ramayana Movie)

================================

हे देखील वाचा : हमाली करणाऱ्या Roshan Bhajankarने कष्टाचे दिवस काढले; नशीबाने थेट उघडलं बिग बॉसच्या घराचं दार

================================

दरम्यान, संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ (Spirit) हा चित्रपट २०२७ मध्ये रिलीज होणार असून यात प्रभास (Prabhas)आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) प्रमुख भूमिकेत असणार आहेत… सुरुवातीला दीपिका पादूकोण (Deepiak Padukone) आणि प्रभास ही जोडी यात दिसणार होती, मात्र काही कारणांमुळे दीपिकाला यात रिप्लेस करत तृप्तीने ही भूमिका पटाकवली… ‘अॅनिमल’ चित्रपटानंतर संदीप यांच्यासोबत तृप्तीचा हा दुसरा चित्रपट असणार आहे… तर, एस.एस.राजामौली यांचा ‘वाराणसी’ (Varanasi) हा १००० कोटींचं बजेट असणारा चित्रपट असून यात महेश बाबू (Mahesh Babu) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लीड कलाकार असणार आहेत… बॉलिवूडपासून दूर गेल्यानंतर तब्बल ४-५ वर्षांनी प्रियांकाने कमबॅक केलं असून तिने बॉलिवूडऐवजी साऊथ चित्रपटांना प्राधान्य दिलं आहे… त्यामुळे आता Male Oriented Directorial चित्रपटांच्या यादीत गीतू मोहनदास आपली छाप उमटवणार का? हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे…. (Upcmomg Big budget movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aaditya dhar Bollywood dhurandhar 2 geetu mohandas Indian Cinema malalyalam movies nitesh tiwari prabhas Priyanka Chopra ramayana Ranbir Kapoor Ranveer Singh sandip reddy vanga South movies spirit ss rajamouli toxic Tripti Dimri varanasi Yash
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.