
मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का !
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हिने मुंबईत आणखी एक मोठी गुंतवणूक करत आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. वांद्रे परिसरातील ‘बे हाइट्स’ या प्रकल्पात घेतलेल्या या घराची किंमत तब्बल ७.६३ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकल्प Hiranandani Developers यांच्याकडून उभारला जात आहे आणि सध्या बांधकामाधीन अवस्थेत आहे.(Actress Tejaswi Prakash)

सीआरई मॅट्रिक्सकडून उपलब्ध झालेल्या नोंदीनुसार, तेजस्वीने १६ फेब्रुवारी २०२६ रोजी या घराची अधिकृत नोंदणी केली. १४व्या मजल्यावरील हे अपार्टमेंट सुमारे १,३०४ चौरस फूट (अंदाजे १२१.१४ चौरस मीटर) क्षेत्रफळाचं असून त्यासोबत दोन राखीव पार्किंग जागाही मिळणार आहेत. या व्यवहारासाठी जवळपास ३८.१५ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याची नोंद आहे. करारानुसार नोव्हेंबर २०३० पर्यंत घराचा ताबा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

तेजस्वी ही अभिनयासोबतच ती ब्रँड एंडोर्समेंट, सोशल मीडिया आणि विविध व्यावसायिक उपक्रमांमधून उत्पन्न मिळवते. यापूर्वी एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, ती फक्त कमाईवर अवलंबून न राहता गुंतवणुकीवर भर देते. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे, स्वतःचा सलून व्यवसाय सुरू करणे अशा विविध क्षेत्रांत ती सक्रिय आहे. महागड्या वस्तूंवर खर्च करण्यापेक्षा दीर्घकालीन फायद्याचा विचार करून मालमत्तेत गुंतवणूक करणं अधिक योग्य असल्याचं तिचं मत आहे. त्यामुळेच तिची प्रत्येक खरेदी ही केवळ लक्झरी नसून स्मार्ट इन्व्हेस्टमेंट म्हणूनही पाहिली जात आहे. (Actress Tejaswi Prakash)
==============================
==============================
दरम्यान, तेजस्वीच्या या नव्या घरखरेदीमुळे तिच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर तिच्या या यशाचं कौतुक होत असून, करिअरसोबत आर्थिक नियोजनातही ती आघाडीवर असल्याचं अनेकांनी नमूद केलं आहे. अभिनय, व्यवसाय आणि गुंतवणूक यांचा समतोल साधत तेजस्वी स्वतःची वेगळी ओळख अधिक भक्कम करताना दिसत आहे.