Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद यांचा लग्नसोहळा थाटामाटात संपन्न…

 Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद यांचा लग्नसोहळा थाटामाटात संपन्न…
Aetashaa Sansgiri Wedding Photo
टीव्ही वाले मिक्स मसाला

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद यांचा लग्नसोहळा थाटामाटात संपन्न…

by Team KalakrutiMedia 23/02/2026

मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराईचं वातावरण आहे. अलीकडेच अभिनेत्री रेवती लेले (Actress Revati Lele) हिचा विवाहसोहळा पार पडला आणि आता छोट्या पडद्यावरील आणखी एका गोड जोडीने आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. स्टार प्रवाहवरील ‘तुझ्या सोबतीने’ या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली एतशा संझगिरी (Aetashaa Sansgiri) हिने अभिनेता निषाद भोईर (Nishad Bhoir) सोबत २२ फेब्रुवारी रोजी पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने लग्नगाठ बांधली. एतशा आणि निषादची पहिली भेट ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झाली. कोल्हापूरच्या निसर्गरम्य वातावरणात सुरू असलेल्या शूटिंगदरम्यान दोघांची मैत्री हळूहळू घट्ट होत गेली. कामाच्या निमित्ताने सुरू झालेला संवाद वैयक्तिक आयुष्यातही रंगू लागला. एका खास क्षणी निषादने एतशासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि तिथून त्यांच्या प्रेमप्रवासाची सुरुवात झाली. (Aetashaa Sansgiri Wedding)

Aetashaa Sansgiri Wedding
Aetashaa Sansgiri Husband

विशेष म्हणजे, नातं सुरू झाल्यानंतर काहीच महिन्यांत एतशाने घरच्यांशी या नात्याबद्दल खुलासा केला. दोन्ही कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर त्यांनी चार वर्षे एकमेकांना समजून घेत, नातं अधिक मजबूत केलं. ऑक्टोबर २०२५ मध्ये साखरपुडा पार पडला आणि अखेर आता दोघेही विवाहबंधनात अडकले. लग्नसोहळ्यात एतशा आणि निषाद दोघांनीही पारंपरिक मराठमोळ्या पेहरावाला पसंती दिली. एतशाच्या नऊवारी साडीतला देखणा अवतार आणि निषादचा साधा पण उठावदार लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. फोटोंमधील दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान त्यांच्या नात्याची गोडी स्पष्ट करत होता. या खास सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली.

Aetashaa Sansgiri Wedding
Aetashaa Sansgiri Wedding Husband

एतशा संझगिरीने ‘राजा राणीची गं जोडी’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ आणि ‘निवेदिता माझी ताई’ यांसारख्या मालिकांतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ‘तुझ्या सोबतीने’मधील तिची भूमिका विशेष गाजत आहे.निषाद भोईरही मराठी मालिकांमधील ओळखीचं नाव आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ आणि ‘आई-मायेचं कवच’ यांसारख्या मालिकांतून त्याने आपली वेगळी छाप पाडली आहे. योगायोगाने ‘निवेदिता माझी ताई’ आणि ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या दोन मालिकांमध्येही ही जोडी एकत्र झळकली होती. (Aetashaa Sansgiri Wedding)

===============================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat यांची भावनिक पोस्ट…

===============================

एतशा आणि निषाद यांची व्यावसायिक आयुष्यातून सुरू झालेली ओळख आता वैवाहिक आयुष्यात रूपांतरित झाली आहे. चाहत्यांकडून या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वजण मनापासून शुभेच्छा देत आहेत. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aetashaa Nishad wedding Aetashaa Sansgiri Celebrity Dakkhancha Raja Jotiba Entertainment Etasha Sanzgiri wedding photos Marathi celebrity wedding marathi entertainment news Marathi serial actors Marathi Television News Marathi TV actors wedding Marathi TV industry Nishad Bhoiir Tujhya Sobtine
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.