Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…
“बिग बॉस १९” (Bigg Boss 19) मध्ये दिसल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल (Tanya Mittal) सध्या तिच्या लग्नाच्या अफवा आणि चर्चांमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.आता ही तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. तान्याने नुकत्याच शेअर केलेल्या इन्फ्लुएन्सर पोस्ट्समुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अलीकडे तिने एका व्हिडिओमध्ये ट्रायल रूममध्ये लाल वधूच्या लेहेंग्यात सजलेली दिसत होती, ज्यावर तिने कॅप्शन दिलं, “तयारी सुरू झाली आहे.” या पोस्टनंतर लगेचच तिने आणखी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती निळ्या रंगाच्या लेहंग्यात अतिशय सुंदर दिसत होती. ट्रायल रूममधून बाहेर पडताना तिने उपस्थित लोकांना मिश्कीलपणे विचारले, “तुम्हाला असं वाटत नाही ना की बिग बॉस पुन्हा सुरू झाला आहे?” तिच्या या कॅप्शनने चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाबाबत उत्सुकता वाढवली, आणि अनेकांनी अंदाज बांधला की ती लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.(Tanya Mittal Wedding)

सध्या तान्या मित्तलने लग्नाची अधिकृत पुष्टी केलेली नाही, नवऱ्याबाबत किंवा लग्नाची तारीखही सार्वजनिक केलेली नाही. तिचा चाहत्यांसोबत सस्पेन्स ठेवण्याचा अंदाज पाहता, लवकरच कोणताही मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. तरीही, हा फक्त वधूच्या फोटोशूटसाठी तयार केलेला व्हिडिओ असण्याची शक्यता देखील आहे. तान्या मित्तल फक्त टीव्ही स्टार नाही तर एक सुप्रसिद्ध उद्योजक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही आहे.

तान्या मित्तल स्वतःचा ब्रँड “हँडमेड विथ लव्ह बाय तान्या” चालवते आणि तिचे इंस्टाग्रामवर २५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. महाकुंभ २०२५ मधील तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिने राष्ट्रीय स्तरावर मोठा पत्ता मिळवला. बिग बॉस १९ मध्ये सहभागी होऊन तिने आणखी प्रसिद्धी मिळवली आणि तिची ओळख एक बहुआयामी स्टार म्हणून प्रस्थापित झाली. (Tanya Mittal Wedding)
==============================
==============================
ग्लॅमरने भरलेल्या तान्या मित्तलने पोस्ट्समुळे आता चाहत्यांमध्ये तिच्या वैयक्तिक जीवनाविषयी उत्सुकता कायम राहणार आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्या लग्नाची प्रतीक्षा करत आनंद व्यक्त केला आहे, आणि लवकरच हा सस्पेन्स खरा आहे की फक्त फोटोशूट, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.