Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने केली परखड टीका

 “The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने केली परखड टीका
मिक्स मसाला

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने केली परखड टीका

by रसिका शिंदे-पॉल 23/02/2026

कधी कोणत्या चित्रपटावर किंवा मेकर्सवर टीका होईल याचा काही नेम नाही. अशाच कॉन्ट्रोवर्सी सध्या ‘द केरला स्टोरी २:गोज बियॉंड’ (The Kerala Story 2:Goes Beyond) मुळे सुरु झाली असून चक्क दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी या चित्रपटाला अतिशय वाईट चित्रपट असल्याचं म्हणत टीका केली आहे. इतकंच नाही कश्यप यांनी केरला स्टोरी २ चे दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंग यांच्यावरही टीका केली आहे. काय म्हणालेत कश्यप जाणून घेऊयात… (Entertainment News)

काही दिवसांपूर्वीच अनुराग यांना ‘द केरला स्टोरी २ : गोज बियॉंड’ बद्दल माध्यमांनी विचारलं असता त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. इतकंच नाही तर, ट्रेलरमध्ये दाखवलेल्या बीफ सीनवरही त्यांनी रोष व्यक्त केला आहे. अनुराग यावेळी म्हणाले की, “ज्याप्रमाणे बीफ खायला घातलेलं दाखवण्यात आलंय, तसं तर कोणी खिचडी पण खायला देत नाही. हा चित्रपट केवळ पैसे कमविण्यासाठी आणि लोकांना फूट पाडण्यासाठी बनवण्यात आला आहे. हा एक प्रोपोगंडा निर्माण करण्यासाठीचा चित्रपट असून या चित्रपटाचा निर्माता एक लोभी माणूस आहे. तो फक्त पैसे कमवू इच्छितो”. (Anurag Kahsyap)

दरम्यान, नुकतीच केरळ उच्च न्यायालयाने ‘द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड’ च्या निर्मात्यांना आणि सेन्सॉर बोर्ड ऑफ कंट्रोलला नोटीस बजावली आहे. सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आली होती.  तर, या संपूर्ण प्रकरणानंतर निर्माते विपुल शाह यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या निवेदनात म्हटलं की, “हा चित्रपट भारतीय न्यायव्यवस्थेत घडलेल्या खऱ्या घटनांवर आधारित आहे. तीन मुख्य कथांसह, इतर अनेक घटनांचा देखील समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून चित्रपट संपूर्ण देशातील परिस्थितीचं अधिक चांगल्या प्रकारे दर्शन घडवून आणेल. हा चित्रपट तीन मुलींची कथा सांगतो, परंतु तो इतर अनेक मुलींच्या घटना देखील सादर करतो.”(Kamakhya Narayn Singh)

================================

हे देखील वाचा : Anurag Kashyap : कश्यपने ‘या’ कारणामुळे मुंबईला केला कायमचा राम राम!

================================

अनुराग यांच्या या टीकेवर चित्रपटाचे दिग्दर्शक कामाख्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अनुराग कश्यप यांनी असं म्हटलं की असं कुणी कोणाला खिचडी खायला देत नाही. मी मानतो, कुणी कोणाला लाडू पण खायला देत नाही. पण दुर्भाग्याने आपल्या सामाजात आपल्या लेकी-बाळींना त्यांचा धर्म बदलवण्यासाठी बीफ खायला दिलं जातं हा गुन्हा आहे.” पुढे ते असं देखील म्हणाले की, प्रोब्लेम असा आहे की अनुराग कश्यप मानसिकरित्या दुर्बल झाले आहेत, त्यांना सगळ्याच गोष्टीत प्रोब्लेम आहे. त्यांना ब्राम्हणांबद्दलही आक्षेप आहे. नेटप्लिक्स, फिल्म इंडस्ट्री अशा सगळ्याच गोष्टींचा त्यांना त्रास आहे”. (Bollywood)

त्यामुळे आता अनुराग कश्यप यांनी चित्रपटाला आणि मेकर्सना फटकाल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीवर कसे उमटणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान, या आधी २०२३ मध्ये आलेल्या द केरला स्टोरी या सुदिप्तो सेन दिग्दर्शित चित्रपटावरही ताशेरे ओढले गेले होते. या चित्रपटाच्या मेकर्स आणि कलाकारांना देखील टीकेचा सामना करावा लागला होता. आता द केरला स्टोरी २ चित्रपटावरही तिच वेळ आहे. आता नेमकं काय होणार? लोकं या चित्रपटाला कसा प्रतिसाद देणार याचं उत्तर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळेल. (Anurag Kashyap Controversy)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: anurag kashyap anurag kashyap controversy kamakhya narayan singh sudipto sen The Kerala Story The Kerala Story 2 the kerala story 2 - goes beyond controversy
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.