Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला घरखर्च; कोरलंय ६ राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव!
सिनेमा बनवायचा तर तो लार्जर दॅन लाईफचं हा मंत्र कायम पुर्ण करणारे दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी… आज कोट्यावधी रुपयांची संपत्ती जरी त्यांच्या नावे असली तर स्ट्रगलींग पीरीऐडमध्ये त्यांनी साड्यांना फॉल लावून घरखर्छ भागवलाय… इतकंच नाही तर चाळीत राहून आपलं आय़ुष्य त्यांनी घडवलंय… आज बॉलिवूडच्या या स्टार दिग्दर्शकाचा वाढदिवस… जाणून घेऊयात संजय लीला भन्साळी यांच्या जीवनबद्दल काही खास गोष्टी…
संजय लीला भन्साळी म्हणजे इंडस्ट्रीतलं मोठं नावं… पण ते कमवण्यासाठी त्यांनी फार खस्ता खालल्या आहेत…आज यशाच्या शिखरावर असलेल्या संजय यांनी एकेकाळी अतिशय कठीण काळ पाहिलाय. त्यांचं बालपण, तारुण्यातील सुरुवातीचा काळ आणि सुरुवातीचं करिअर सोपं नव्हतं. एका चाळीतील लहानशा घरात राहिलेल्या, शून्यातून सुरुवात केलेल्या भन्साळींनी आज त्यांच्या सिनेमांनी भारतासह जगभरात लोकप्रियता मिळवलीये. त्यांचा जन्म एका गुजराती जैन कुटुंबात झाला. २००२ मध्ये सिमी ग्रेवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कुटुंबातील कठीण काळ सांगितला होता. (Bollywood Director sanjay leela bhansali)

वडील सतत दारुच्या नशेत असायचे, ते दारुच्या आहारी गेल्याने अशा परिस्थितीत त्यांच्या आईला काम करण्यासाठी घराबाहेर पडावं लागलं होतं. ते आणि त्यांची आई दोघं एका दुकानातून साड्या आणायचे आणि दोघं मिळून साड्यांना फॉल लावण्याचं काम करायचे. कधी चार तर कधी २४ साड्या फॉल लावण्यासाठी मिळायच्या. त्यावरचं घरचं राशन भरलं जात होतं.. संजय यांचे वडील नवीन भन्साळीदेखील निर्माते होते. त्यांनी १९५७ मध्ये ‘जहाजी लुटेरा’ सिनेमा बनवला होता. पण ते या क्षेत्रात यशस्वी होऊ शकले नाहीत आणि याच अपयशातून ते दारुच्या आहारी गेले. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!
================================
संजय यांच्या आईने आपल्या मुलांना शिकवलं आणि त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी भन्साळींनी पुण्यातील FTII मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा ‘परिंदा’ हा सिनेमा बनवत होते. कॉलेजमध्ये भन्साळींचं काम पाहून विधू विनोद चोप्रा इम्प्रेस झाले आणि त्यांनी भन्साळींना असिस्टेंट बनवलं. आणि इथूनच भन्साळी यांचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअर सुरू झालं. बरं, आपल्या आईने कठीण परिस्थीतही आपल्याला शिकवलं, मोठं केलं याचं भान ठेवून एकदा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केल्यानंतर सिनेमात केलेल्या सर्वांची नावं स्क्रिनवर टाकण्यासाठी लिस्ट मागवण्यात आली होती. त्यावेळी भन्साळींनी स्क्रिनवर लिहिण्यासाठी आपलं नाव संजय लीला भन्साळी असं लिहून दिलं. आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या आईचं नाव लावण्यास सुरुवात केली आणि भारताला मिळाले ६ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे पद्मश्री संजय लीला भन्साळी…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi