Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील दिग्गजांचा अपमान करतोय का?”
मराठी कलाकार आपली भाषा, आपली संस्कृती कधी कधी फार जपत नाही असा आरोप नकळतपणे त्यांच्यावर केला जातो. अशातच आता परखडपणे कायम आपलं मत मांडणाऱ्या सई ताम्हणकरने अमराठी कलाकारांबदद्ल फार महत्वाचं विधान केलं आहे. मराठी कलाकार आता भाषेच्या अडचणीशिवाय हिंदीसह साऊथ फिल्म्समध्ये काम करताना दिसत आहेत. अशावेळी काही पुरस्कार सोहळ्यांमध्ये मराठी कलाकारांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणूकीबद्दल सईने टीका केली आहे. “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील दिग्गजांचा अपमान करतोय का?” असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. (Sai Tamhankar)
दरम्यान, सई ‘विषय खोल’शी बोलताना म्हणाली की, “आपण म्हणतो की मराठी बोला, मराठीसाठी आग्रह धरतो, पण, दुसरीकडे अनेकदा आपण पाहतो की, आजकाल पुरस्कार सोहळ्यांना इतर सिनेसृष्टीतील अमराठी कलाकारांना आमंत्रित केले जाते. मात्र, या प्रक्रियेत एक मोठी विसंगती दिसून येते. अमराठी कोणी आर्टिस्ट आले की त्यांना आपण पहिल्या रांगेत बसवतो आणि ज्या ज्येष्ठ कलाकारांनी ३०-४० वर्षे काम केलं आहे, त्यांना या भव्य पुरस्कार सोहळ्यांमध्ये अनेकदा मागच्या रांगेत स्थान दिले जाते. हे मला पटत नाही”. (Marathi Language)

पुढे ती असं देखील म्हणाली की, “टीआरपी वाढवण्यासाठी आणि सोहळ्याला ‘ग्लॅमर’ प्राप्त करून देण्यासाठी दुसऱ्या फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांना अतोनात महत्त्व दिले जाते. आज मागे बसलेले हेच ज्येष्ठ कलाकार एकेकाळी इतके लोकप्रिय होते की, त्यांच्या सिनेमाची तिकिटे २००-३०० रुपयांत ब्लॅकने विकली जायची. दुसऱ्या इंडस्ट्रीमधून आलेली लोक काहीतरी मोडकतोडक मराठी बोलणार ते आपण सेलिब्रेट करतो. आपण स्वतःला किती सेलिब्रेट करतोय आणि त्यात आपल्याला खरोखर आनंद मिळतोय का? हे पाहणे गरजेचे आहे“. आता तिच्या या वक्तव्यावर काही प्रतिक्रिया येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Entertainment News)
================================
================================
सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, २०२४ मध्ये ‘भक्षक’ चित्रपटात तिने काम केलं होतं. या व्यतिरिक्त ‘मिमि’, ‘द सिक्रेट ऑफ शिलेदार्स’, ‘अ’ग्नी’, ‘ग्राऊंड झिरो’, ‘क्राइम बीट’ अशा अनेक हिंदी प्रोजेक्ट्समध्ये तिने कामं केली आहेत. आता तिच्या आगामी मराठी-हिंदी चित्रपटांची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत यात तिळमात्र शंका नाही.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi