Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika & Vijay : ‘विरोश’च्या हळदीचे खास फोटो आले समोर;

The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री; तब्बल १६

Bigg Boss Marathi 6: ‘आम्ही रीलस्टार नाही रियल स्टार’, Bigg

‘बागबान‘ सिनेमाकरीता बी आर चोप्रा यांना Dilip Kumar हवा होता!

Abhinay Berde, हार्दिक जोशी अभिनेत्री प्रितम कागणे, दीप्ती देवी यांचा

Rohit Raut म्हणतोय ‘डीपी झूम करून’

Big Boss Marathi 6 : टोळी आणि बाल्कनी ग्रुपने केलं

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री; तब्बल १६ सीन्समध्ये केले मोठे बदल…

 The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री; तब्बल १६ सीन्समध्ये केले मोठे बदल…
The Kerala Story 2
मिक्स मसाला

The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री; तब्बल १६ सीन्समध्ये केले मोठे बदल…

by Team KalakrutiMedia 25/02/2026

कामख्या नारायण सिंग दिग्दर्शित The Kerala Story 2: Goes Beyond हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. 27 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाभोवती सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांपासून ते विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी चित्रपटावर टीका केली आहे. मात्र सर्व बाजूंनी होणाऱ्या आक्षेपांदरम्यान सेन्सॉर प्रक्रियेबाबत मोठा निर्णय समोर आला आहे. Central Board of Film Certification (CBFC) ने चित्रपटाला U/A 16+ प्रमाणपत्र देत प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दिला आहे. ट्रेलर आणि टीझरमधील काही दृश्यांवरून चित्रपटाला ‘A’ प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, बोर्डाने काही अटींसह 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी चित्रपट मंजूर केला आहे.(The Kerala Story 2)

The Kerala Story 2
The Kerala Story 2

सीबीएफसीने निर्मात्यांना तब्बल 16 बदल सुचवले होते. काही लिप-लॉक दृश्ये आणि महिलांवरील अत्याचार दाखवणाऱ्या प्रसंगांमध्ये कात्री चालवण्यात आली आहे. महिलांना कानाखाली मारण्याचे आणि डोक्यावर प्रहार दाखवणारे दोन वेगवेगळे सीन तसेच आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याचे दृश्य यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय तीन ठिकाणी संवादांमध्ये बदल करण्यात आले असून एक आक्षेपार्ह शब्द पूर्णपणे म्यूट करण्यात आला आहे.

The Kerala Story 2
The Kerala Story 2

चित्रपटाची कथा सत्य घटनांवर आधारित असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हा दावा समर्थित करणारा डिस्क्लेमर चित्रपटात समाविष्ट करण्याचे आदेश बोर्डाने दिले. यासाठी निर्मात्यांकडून संबंधित कागदपत्रांचीही मागणी करण्यात आली होती. तसेच अल्पवयीन कलाकारांच्या कास्टिंगसंदर्भात संमतीपत्र सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. (The Kerala Story 2)

==============================

हे देखील वाचा: Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके रॅप ‘वाघ आला’ प्रदर्शित; सोशल मीडियावर होतेय चर्चा! 

==============================

निर्माते आणि दिग्दर्शकांनी सुचवलेले सर्व बदल केल्यानंतरच चित्रपटाला अंतिम प्रमाणपत्र देण्यात आले. सुधारित आवृत्तीचा एकूण रनटाईम 131 मिनिटे निश्चित करण्यात आला आहे, म्हणजेच 2 तास 11 मिनिटे 24 सेकंदांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाद, टीका आणि सेन्सॉर प्रक्रियेनंतर आता चित्रपट प्रत्यक्ष प्रदर्शनात कसा प्रतिसाद मिळवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रिलीजपूर्वीच चर्चेत आलेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी काय असेल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood News CBFC Celebrity Central Board of Film Certification Entertainment film censorship India Goes Beyond Kamakshya Narayan Singh Kerala Story sequel movie controversy The Kerala Story 2 U/A 16+
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.