Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

“सलग ५ दिवस सुरूच होतं आणि सहाव्या दिवशी मी रुग्णालयात

Lata Mangeshkar आणि साहिर लुधियानवी यांच्यात का मतभेद झाले होते?

Nana Patekar आता ओटीटी गाजवणार; ‘संकल्प’ वेब सीरीज लवकरच येणार

Super Duper Marathi Movie Teaser:  ३ एप्रिलला रंगणार कौटुंबिक जल्लोष;

Big Boss Marathi 6 :  रितेश देशमुखने तन्वीला दाखवला आरसा!

Riteish Deshmukhच्या गाजलेल्या चित्रपटाचा तब्बल २० वर्षांनी येणार सीक्वेल!

मालिका विश्वातली प्रेक्षकांची आवडती गौरी-जयदीपची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने

Jai Jai Swami Samarth Serial: होळी पौर्णिमेला रंगणार थरारक पर्व;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“सलग ५ दिवस सुरूच होतं आणि सहाव्या दिवशी मी रुग्णालयात होते”; मराठमोळ्या अभिनेत्रीने लगावला Deepika Padukone ला टोला

 “सलग ५ दिवस सुरूच होतं आणि सहाव्या दिवशी मी रुग्णालयात होते”; मराठमोळ्या अभिनेत्रीने लगावला Deepika Padukone ला टोला
मिक्स मसाला

“सलग ५ दिवस सुरूच होतं आणि सहाव्या दिवशी मी रुग्णालयात होते”; मराठमोळ्या अभिनेत्रीने लगावला Deepika Padukone ला टोला

by रसिका शिंदे-पॉल 28/02/2026

काही महिन्यांपूर्वी दीपिका पादूकोण हिने फक्त ८ तासांची फिल्म सेटवर शिफ्ट असावी असा हट्ट धरला होता. या हट्टापायी तिने स्पिरीट चित्रपटातूनही एक्झिट घेतली होती. इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी दीपिकाची बाजू घेतली होती त काहींनी तिच्या विरोधातही प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता हिंदीत आपलं स्थान निर्माण करणाऱ्या मराठी अभिनेत्रीने ८ तासांच्या शिफ्टबद्दल आपलं मत मांडत दीपिकाला टोला लगावला आहे. कोण आहे ती अभिनेत्री आणि ती काय म्हणाली आहे जाणून घेऊयात…

कलाकार दिवसाला १२ तास काम करतो, तर कधी त्याहून अधिक काळ काम करत असतो; त्यामुळे खासगी आयुष्य, कुटुंब यासाठी त्यांना वेळच मिळत नाही. यावर मराठमोळी अभिनेत्री ईशा कोपिकरनेसुद्धा याबद्दलचा तिचा अनुभव सांगितला आहे. सलग ५ दिवस सतत काम केल्यामुळे ईशा कोपिकरला चक्क रुग्णालयात दाखल व्हावं लागलेलं, ईशाने भारती सिंह व हर्ष लिंबाचियाला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे.

ईशा कोपिकर म्हणाली की, “पण आता तर तुम्ही फक्त ८ तास देणं अपेक्षित असतं. ज्यांना मुलं आहे त्यांना फक्त ८ तास मिळतात.” असं म्हणत तिने दीपिका पादुकोणचं नाव न घेतला तिला टोमणा मारला. यावेळी हर्षने तिला गमतीत कोण म्हणालंय हे असं विचारल्यानतंर तिने हसत “मला नाही माहीत” असं उत्तर दलं. ईशाला पुढे दिवसाला किती वेळ काम करते असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “ते लोक तुम्हाला तुमच्यामध्ये उभे राहण्याची क्षमता आहे तोवर काम करायला लावतात.” हर्ष यावर हसत म्हणाला, “तुम्ही बेशुद्ध पडण्याच्या १५ मिनिटांपर्यंत ते तुम्हाला काम करायला लावतात.” पुढे ईशाने तिच्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यानचा एक अनुभव सांगितला. ईशा म्हणाली, “मी एकेकाळी इतकं सलग काम केलं आहे की मला फिल्म सिटीतून घरी जाण्यासाठीसुद्धा वेळ मिळत नव्हता.”

पुढे ईशा असं देखील म्हणाली की, “मी निर्मात्याला सांगितलं की सेटवरच माझ्या राहण्याची सोय करा. तेव्हा मी ९ ते ५ आणि ७ ते ७ असं सलग शूटिंग करायचे. असं सलग ५ दिवस सुरूच होतं आणि सहाव्या दिवशी मी रुग्णालयात होते. आता तिच्या या विधानानंतर दीपिका काही मत व्यक्त करणार का? ८ तासांच्या शिफ्टवर ठाम राहणार की आपलं मत बदलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

================================

हे देखील वाचा : Deepika Padukone ठरली मेटा एआयला आवाज देणारी पहिली भारतीय

================================

ईशा कोपिकरच्या चित्रपटांबद्दल म्हणायचं झालं तर, ‘३६ चायना टाऊन’, ‘दिल का रिश्ता’, ‘रुद्राक्ष’, ‘आमदनी अठ्ठनी खर्चा रुपय्या’, ‘क्रिष्णा कॉटेज’, ‘क्या कुल है हम’, ‘हॅलो डार्लिंग’, ‘मैने प्य़ार क्यु किया’, ‘हॅलो’ अशा हिेदीसह काही साऊथ चित्रपटांतही ती झळकली आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Celebrity Deepika Padukone Entertainment isha koppikar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.