Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…
Varsha Usgaonkar या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्रीला मोठा आर्थिक फटका बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेत्री Mrinalini Jambhale यांच्यासह काही महिलांची एकूण तब्बल 47 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून Shivaji Park Police Station येथे यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात दिग्दर्शक तसेच बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून गुंतवणुकीच्या नावाखाली नेमकी कशी फसवणूक करण्यात आली याचा तपास सध्या सुरू आहे. (Varsha Usgaonkar)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची तक्रार अभिनेत्री मृणालिनी जांभळे यांनी केली आहे. रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या मृणालिनी यांची आरोपी अविनाश जाधव यांच्याशी आधीपासून ओळख होती. जाधव यांनी स्वतःला चित्रपट निर्माता आणि बिल्डर असल्याचे सांगत डोंबिवली येथील एका बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक करण्याची ऑफर दिली होती. या प्रकल्पात पैसे गुंतवल्यास चांगला नफा मिळेल आणि वर्षभरात संपूर्ण रक्कम परत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या बोलण्यावर विश्वास ठेवून नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान मृणालिनी जांभळे, वर्षा उसगांवकर आणि त्यांच्या ओळखीतील आणखी तीन जणांनी चेक तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण 47 लाख रुपये गुंतवले.

सुरुवातीला आरोपीने विश्वास संपादन करण्यासाठी परतावा म्हणून सुमारे साडेचार लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर त्यांनी उर्वरित रक्कम देणे थांबवले. तक्रारदारांनी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने प्रतिसाद देणे टाळल्याचा आरोप आहे. याशिवाय त्यांनी आपला मोबाईल क्रमांक आणि राहण्याचा पत्ता देखील बदलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (Varsha Usgaonkar)
=============================
=============================
नंतर तक्रारदारांनी थेट डोंबिवली येथे जाऊन जाधव यांची भेट घेत पैशांबाबत विचारणा केली. मात्र “मी पैसे देणार नाही, जे करायचे ते करा,” असे उत्तर देत त्यांनी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.फसवणुकीची खात्री झाल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी सर्व तक्रारदारांनी दादरमधील Shivaji Park Police Station येथे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश शेजुळ यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलिस अधिक तपशील गोळा करत आहेत.