Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज हंचनाळेची दमदार एंट्री !

 Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज हंचनाळेची दमदार एंट्री !
Sanai Choughade Zee Marathi Serial
टीव्ही वाले मिक्स मसाला

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज हंचनाळेची दमदार एंट्री !

by Team KalakrutiMedia 05/03/2026

‘सनई चौघडे’ (Sanai Choughade Serial ) या झी मराठीवरील नव्या मालिकेमुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेत अभिनेता राज हंचनाळे ( Raj Hanchanale) एक वेगळ्या अंदाजातील नायक साकारताना दिसणार आहे. ‘जय खानोलकर’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून तो एकाच वेळी कणखर, आत्मविश्वासी आणि भावनिक असा स्वभाव असलेला पात्र प्रेक्षकांसमोर आणणार आहे. जय खानोलकर ही व्यक्तिरेखा बाहेरून कठोर आणि थोडी रागीट वाटणारी असली तरी त्याच्या मनात संवेदनशीलता आहे. आपल्या आयुष्यातील काही निवडक व्यक्तींना तो खूप महत्त्व देतो. विशेषतः त्याची आजी, आई आणि बहीण या तीन स्त्रिया त्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाच्या आहेत. शून्यातून स्वतःच्या मेहनतीवर उभं राहिलेला जय कामाबाबत अत्यंत प्रामाणिक, स्पष्ट बोलणारा आणि शिस्तप्रिय असा दाखवण्यात आला आहे. त्याच्या भूतकाळाशी आणि आयुष्यातील अनेक रहस्यांशी संबंधित गोष्टी मालिकेच्या कथानकात पुढे उलगडत जाणार आहेत.(Sanai Choughade Zee Marathi Serial)

Raj Hanchanale in Sanai Choughade Serial
Sanai Choughade Zee Marathi Serial

या भूमिकेबद्दल बोलताना राज म्हणाला, ‘या भूमिकेसाठी माझी निवड झाली म्हणजे मला प्रॉडक्शन हाऊसमधून ऑडिशनसाठी कॉल आला. हे ऐकून मला खूप उत्सुकता वाटली. मला तिने सांगितलं की राजू सावंत डीरेक्टर आणि प्रोड्युसर आहे आणि ही आमच्या प्रोडक्शन ची पहिली सिरीयल आहे आणि प्लस ती झी मराठीवर आहे, सो हे कॉम्बिनेशन… एकदम भन्नाट वाटलं. मी पहिलं ऑडिशन घरातून पाठवलं आणि ते सगळ्यांना आवडलं. त्यानंतर मला सेटवर तीन-चार राऊंडसाठी बोलावण्यात आलं सह कलाकारानं सोबत ऑडिशनसाठी.’ तो पुढे म्हणाला, ‘माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता, कारण या आधी साधारण एक-दोन ऑडिशनमध्ये माझी निवड होत असे, या भूमिकेसाठी मात्र चार-पाच ऑडिशन झाले. तेव्हा थोडे प्रश्न मनात आले, पण आता मागे वळून पाहताना वाटतं की योग्य कलाकार निवडण्यासाठी त्यांनी काटेकोर प्रयत्न केले. त्या प्रक्रियेचा भाग होण्याचा मला आनंद आहे.’

Raj Hanchanale Sanai Choughade Zee Marathi Serial
Sanai Choughade Zee Marathi Serial

जय खानोलकर ही व्यक्ती प्रभावी आणि रुबाबदार दिसावी यासाठी राजने या भूमिकेवर विशेष मेहनत घेतली आहे. त्याने आपल्या बॉडी लँग्वेज, चालण्याची शैली, ॲटिट्युड आणि स्क्रीन प्रेझेन्स यावर काम केलं आहे. मेहनतीने उभं केलेलं स्वतःचं साम्राज्य सांभाळणारा जय अधिकारपूर्ण दिसावा यासाठी त्याने दिग्दर्शकांसोबत चर्चा करत व्यक्तिरेखेतील बारकावे विकसित केले. कठोर स्वभावामागे दडलेली त्याची भावनिक बाजूही प्रेक्षकांना जाणवणं महत्त्वाचं असल्याचं राजने सांगितलं.(Sanai Choughade Zee Marathi Serial)

===============================

हे देखील वाचा: ‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

===============================

मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. विशेषतः “स्वामींची इच्छा” हा संवाद आणि “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” ही ओळ सोशल मीडियावरही चर्चेत आली आहे. दमदार व्यक्तिमत्त्व, स्टाईल आणि भावनिक छटा असलेला जय खानोलकर प्रेक्षकांना नवा अनुभव देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही मालिका १६ मार्चपासून दररोज रात्री ८.३० वाजता Zee Marathi वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment Jay Khanolkar character Marathi Television Updates Marathi TV serial news Raj Hanchanale actor Sanai Choughade cast sanai Choughade serial Zee Marathi new show zee marathi serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.