‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेत पाहायला मिळणार जबरदस्त ॲक्शन सिन!
संजू आणि रणजीतच्या आयुष्यात म्हणजेच कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. हा ट्विस्ट म्हणजे संजूच्या पोटात लागलेली गोळी.
रणजीतला पुण्यात होणाऱ्या बॉम्ब ब्लास्टची माहिती मिळते. तेव्हा तो त्या जागी पोहचून बॉम्ब ब्लास्ट करण्याऱ्या अतिरेक्यांचा शोध घेत असतो, तेव्हा संजीवनी देखील तिथे पोचते. त्या अतिरेक्यांना पकडण्याच्या वेळी झालेल्या गोळीबारात संजूलाही एक गोळी लागते आणि तो अतिरेकी तेथून पळ काढतो.
ॲक्शन सीन्स जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर किंवा मालिकांमध्ये पाहतो तेव्हा ते कसे चित्रित केले गेले असतील, दिसणाऱ्या मारामाऱ्या, रक्तपात ही सगळी दृष्य कॅमेऱ्यात कैद करताना तिथे काय घडत असेल, कोणाला खरंच काही दुखापत तर होत नसेल ना? हे सगळे प्रश्न मनात येतात. अगदी खरेखुरे वाटणारे हेच ॲक्शन सीन्स ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेतही आपण येत्या काही भागात पाहणार आहोत.
संजूला गोळी लागतानाचा सीन कसा चित्रित केला गेला त्याचा हा व्हिडीओ
मालिकेतील थरारक दृष्य ही अशा पद्धतीने चित्रित केली जातात. गोळी लागल्यानंतर संजू जमिनीवर पडते खरी, पण जमिनीवर पडताना तिला काही दुखापत होऊ नये म्हणून तेथे गादी ठेवलेली आपल्याला या ‘बिहाईंड द सीन’ व्हिडीओत पाहायला मिळतंय.
नवऱ्याचं आयुष्य वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता संजू रणजीतच्या पुढे धावली आणि अतिरेक्याच्या बंदूकीतून सूटलेली गोळी तिला लागली. एकंदर चित्रित झालेला सीन पाहता संजूच्या जिवाला नक्कीच धोका आहे असं चित्र आहे. शिवाय त्या अतिरेक्यांना पकडणंही रणजीतसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
मालिकेत आता काय होणार? संजूच्या जिवाचं काही बरं वाईट तर होणार नाही ना? संजूला लागलेल्या एका गोळीने आता मालिकेला कशी आणि काय कलाटणी मिळणार? असे भरपूर प्रश्न आता मालिकेच्या प्रेक्षकांना पडले आहेत.
=====
हे देखील वाचा: ‘झी मराठी’वरच्या या लोकप्रिय मालिकेची जागा घेणार ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका
=====
मालिकेत पोलिसांची भूमिका म्हटल्यावर चोर, गुंड, गुन्हेगार यांच्यासोबतचे खतरनाक ॲक्शन सीन्स तर अधूनमधून घडायलाच हवेत. पण आपल्या हिरोईनलाच गोळी लागलीये म्हटल्यावर विषय जरा चिंतेचा आहे, नाही का?
शेवटी संजू ही कर्तबगार नायिका आहे. कितीही काहीही झालं तरी संजूला कसंही रणजीतराव वाचवणारच. मालिका आणि मालिकांमधले असे रंजक किस्से सुरुच राहणार. तुम्हाला हा सीन कसा वाटला ते कलाकृती मिडीयाच्या सोशल मीडियावर नक्की कळवा. तुमच्या आवडत्या मालिका आणि त्याचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घ्या फक्त कलाकृती मिडियावर!
– वेदश्री ताम्हणे