Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Tango Malhar Movie Trailer: सिनेमातून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य

Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

‘अमानुष’ : उत्तमकुमार- Sharmila Tagore यांचा अप्रतिम सिनेमा!

Siddharth Ray : “त्याला उचकी आली आणि…”, ‘अशी ही बनवाबनवी’तील

Jolly LLB 3: अक्षय कुमार-अर्शद वारसी येणार आमनेसामने!

Manoj Bajpayee : “मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो”!

सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

Aatali Batami Phutli Trailer:  धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

किस्सा तलत मेहमूद यांच्या पहिल्या गाण्याचा!

 किस्सा तलत मेहमूद यांच्या पहिल्या गाण्याचा!
कलाकृती विशेष

किस्सा तलत मेहमूद यांच्या पहिल्या गाण्याचा!

by धनंजय कुलकर्णी 24/02/2022

आज २४ फेब्रुवारी! आज तलत महमूद (Talat Mahmood) यांचा जन्मदिन. २४ फेब्रुवारी १९२४ या दिवशी त्यांचा जन्म झाला. सिनेमाच्या सुवर्णयुगाचा महत्वाचा साक्षीदार होता तलत महमूद. तपन कुमार या नावाने तो कलकत्यात गात असे.

‘तसवीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी’ ‘सब दिन एक समान नही था’ या आणि अशा अनेक गैरफिल्मी गाणी व गजल यातून त्याने सुरूवातीला चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. मखमली स्वराच्या तलतच्या आवाजात एक नैसर्गिक कंप होता. 

तलतच्या पहिल्याच सिनेमाच्या गाण्याच्या वेळचा किस्सा त्यावेळी प्रसिद्ध झालेला असला तरी तो आजच्या पिढीलाही सांगण आवश्यक आहे. तलतच्या आवाजाची जादू ओळखून अनिल विश्वास यांनी त्याला मुंबईला बोलावले. त्याला पहिलाच प्ले बॅक द्यायचा होता तो दिलीपकुमार यांना! 

Talat Mahmood birthday special: A voice that tugs at the heartstrings

काही विघ्नसंतोषी लोक होते त्यांना तलतच्या या भाग्याचा हेवा वाटू लागला. त्यांनी तलतला, “तुझ्या आवाजात तर कंप आहे. तुझा आवाज सिनेमासाठी योग्यच नाही.” असं सांगत त्याच्या आत्मविश्वासाला सुरूंग लावायचा प्रयत्न सुरू केला. बिचारा तलत महमूद (Talat Mahmood) यामुळे प्रचंड उदास झाला.

पहिल्याच गाण्याच्या वेळी (’आरजू’ सिनेमा – १९५०) तो प्रचंड उदास होता. तालमीच्या वेळी तो नैसर्गिक आवाजात गात नव्हता. अनिलदांना ते वारंवार खटकू लागलं. तलतला देखील आपण आपल्या स्वत:च्या मूळ आवाजात गात नाही, हे लक्षात येत होतं.

====

हे देखील वाचा: तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला

====

अनिलदा चिडले, “तलत ये तुम क्या गा रहे हो? तुम्हारी आवाज को क्या हो गया? कहां गई तुम्हारी वो आवाज?” 

तलतचा कंठ दाटून आला. त्याने घडलेला किस्सा सांगितला. अनिलदांनी त्यांना धीर दिला आणि तुझ्या आवाजातील कंप हीच तुझ्या स्वरातील मोठी गुणवत्ता आहे, असे प्रशस्तीपत्र दिले आणि तलतला, “जाओ तुम उस तलत को लेके आओ”, असा आदेश दिला. ज्याला तलत महमूद (Talat Mahmood) न्यूनत्व समजत होता तेच त्याचे खरे ‘अ‍सेट’ होते.

Ae Dil Mujhe Aesi Jagah Le Chal - ARZOO - video Dailymotion

 

अनिलदांच्या बोलण्याने शंकेचे,न्यूनगंडाचे सारे सारे मळभ दूर झाले व मोठ्या आत्मविश्वासाने त्याने त्याचे पहिले सिनेमागीत गायले, “ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल जहां कोई न हो..” 

अनिलदांनी त्याला वेळीच सावरले व त्याच्या करीयरला आकार दिला.पुढे सलील चौधरी, मदन मोहन, ओपी, सचिनदा, सी रामचंद्र सर्वांकडे तो पन्नासच्या दशकात गात राहिला. १९६३ सालच्या ‘जहांआरा’ या सिनेमा नंतर मात्र त्याच्या हितशत्रूंनी परत डोकं वर काढलं व त्याला सक्तीची निवृती घ्यायला भाग पाडलं.

====
हे देखील वाचा: मैफिलीत जेव्हा भीमसेन जोशी यांचा स्वर लागला नाही तेव्हा नेमकं काय घडलं?

====

पुढची ३५ वर्षे तो मायानगरीत होता पण त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं.

तलतचे वैशिष्ट्ये हे होते की, त्याने खूप कमी वाईट गाणी गायली! त्याने एकूण गायलेल्या चित्रपट गीतांची  संख्या ५०० च्या आत आहे आणि यातली कमीत कमी ४०० गाणी आपल्या चांगली परिचयाची आहेत! त्यामुळे तलतची सर्वोत्कृष्ट फक्त दहा गाणी काढणं म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आकाशातील केवळ दहाच चांदण्या निवडणं. कारण एक गाणं काढलं की त्यामागची दहा गाणी मनात गुंजारव करू लागतात. तरी देखील नव्या पिढीला तलत काय चीज आहे हे कळावं म्हणून त्याची काही लोकप्रिय गाणी. ही गाणी नक्की ऐका. प्रेमात पडाल या गाण्यांच्या आणि तलतच्या स्वराच्या!

तलत गीतातील ‘हसीन दर्द’ काय असतो तो अनुभवाच एकदा!

  1. जिंदगी देने वाले सून तेरी दुनियासे दिल भर गया 
  2. रात ने क्या क्या ख्वाब दिखाये
  3. जलते है जिसके लिये तेरी आंखो के दिये 
  4. है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सूर में गाते है 
  5. तसवीर बनाता हू मगर तसवीर नही बनती
  6. फिर वही शाम वही गम वही तन्हाई है 
  7. शाम – ए- गम की कसम
  8. ऐ मेरे दिल कही और चल
  9. ऐ गमे दिल क्या करू 
  10. मेरी याद मी तुम न आंसू बहाना
  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Celebrity News Entertainment KalakrutiMedia music Oldsongs Singer TalatMehmood
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.