March 2022 Movies : अखेर मार्चमध्ये प्रदर्शित होणार ‘हे’ 4 बहुचर्चित चित्रपट!
मार्च महिन्यामध्ये काही बीग बजेट चित्रपटांचा बॉक्स ऑफीसवर धमाका होणार आहे. कोरोनामुळे प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले हे चित्रपट मार्च महिन्यात मोठ्या पडद्यावर प्रदर्शीत होत आहेत. त्यामुळे मार्च महिन्या बॉक्स ऑफीसचे वातावरण चांगलेच तापणार आहे. (March 2022 Movies)
झुंड
मार्च महिन्याची पहिलीच सुरुवात एकदम दमदार होणार आहे. बीग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा झुंड चार मार्च रोजी अखेर मोठ्या पडद्यावर येत आहे. स्वतः अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडीयावर याबाबत हमारी टीम आ रही है, म्हणत झुंडचे पोस्टर रिलीज केले आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंडची घोषणा झाली तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत होता. झुंडची कथा स्लम सॉकर फाऊंडेशनचे संस्थापक विजय बोरसे यांच्यावर आधारीत आहे.
झोपडपट्टीमधील मुलांची गुणवत्ता हेरून त्यांची फुटबॉलची टीम करणाऱ्या एका जिद्दी कोचची ही कथा आहे. सैराट फेम नागराज मंजुळे यांच्या या झुंडला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे चार मार्च रोजी स्पष्ट होणार आहे. (March 2022 Movies)
राधे श्याम
बाहुबली फेम प्रभास आणि पुजा हेगडेचा राधे श्याम हा बहुचर्चित चित्रपटही कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. अखेर राधे श्याम ११ मार्चला प्रदर्शित होत आहे. राधे श्याम ही एक प्रेमकथा असून, तो हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.
के. के. राधाकृष्ण कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन असून यात प्रभास आणि पूजा हेगडेबरोबर सचिन खेडकर, प्रियदर्शी पुलिकोंडा, भाग्यश्री, कुणाल रॉय कपूर यांच्या भूमिका आहेत. राध्ये श्यामचे बरेचसे शुटींग इटली आणि जॉर्जिया या देशात झाले आहे. युरोपियन रोमॅंटींक ड्रामा असलेला हा चित्रपट जाहीर झाला तेव्हापासून त्याची उत्सुकता आहे.
भाग्यश्रीचे पुनरागमन हा सुद्धा या चित्रपटाचा एक उत्सुकतेचा विषय आहे. जुलै २१ पासून राध्ये श्याम प्रदर्शनाच्या रांगेत आहे. मात्र आता मार्चचा मुहूर्त नक्की झाला आहे. पुष्पा चित्रपटामळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. आता त्यात राधे श्याम किती भर घालतो हे पहावे लागेल.
बच्चन पांडे
अक्षय कुमारचा बच्चन पांडे १८ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. बच्चन पांडे म्हणजे २०१४ मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट ‘जिगरथंडा’चा रिमेक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे.
साजिद नाडीयादवाला निर्माते असून यात अक्षय कुमार, क्रिती सेनॉन आणि जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, पंजक त्रिपाठी, प्रतिक बब्बर यांच्या भूमिका आहेत. विनोदी कथा असलेल्या बच्चन पांडेंचे प्रदर्शन दोन वेळा पुढे करण्यात आले होते. अखेर होळीचा मुहूर्त साधत आता बच्चन पांडे मोठ्या पडद्यावर येणार आहे.
RRR
बाहुबलीपेक्षही भव्यदिव्य अशी लोकप्रियता मिळवलेला एस. एस. राजामौलीं यांचा RRR हा अत्यंत महागडा चित्रपट अखेर मार्च महिन्याच्या अखेरीस म्हणजे २५ मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. ॲक्शन ड्रामा असलेल्या RRR ची स्टारकास्टही तेवढीच तगडी आहे.
ज्युनियर एन.टी. रामाराव, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, ऑलिव्हिया मॉरिस, समुथिरकानी, एलिसन डूडी, रे स्टीव्हन्सन आणि श्रिया सरन ही कलाकारांची टीम RRR मध्ये आहे.
====
हे देखील वाचा: चक्क मोबाईलवर चित्रित झाला ‘पाँडीचेरी’ हा मराठी चित्रपट .. ‘हे’ होतं त्यामागचं कारण
====
अल्लुरी सीताराम राजू (चरण) आणि कोमाराम भीम (रामाराव) या दोन क्रांतिकारकांची ही काल्पनिक कथा असून हैद्राबादमधील ब्रिटीश अधिकारी आणि निजामाविरुद्ध त्यांनी केलेला उठाव यामध्ये दाखविण्यात आला आहे.
मार्च २०१८ मध्येच RRR या चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून RRR चर्चेत आहे. जवळपास ४०० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाला कोविडचा सर्वाधिक फटका बसला आहे. हा चित्रपट सुरुवातीला ३० जुलै २०२० रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे तारीख पुढे करावी लागली. (March 2022 Movies)
====
हे ही वाचा: ‘मी वसंतराव’ पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…
====
मध्यंतरी चित्रपटाचे केलेले प्रोमोही मागे घेण्याची वेळ आली होती. आता RRR मार्च मध्ये येईल हे नक्की करण्यात आले आहे. या निमित्तानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक चित्रपट हिंदीमध्ये येत आहे.
– सई बने