Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जस्ट मोहब्बत: उमलत्या वयातील अलवार भावभावनांचा अविष्कार

 जस्ट मोहब्बत: उमलत्या वयातील अलवार भावभावनांचा अविष्कार
आठवणीतील मालिका

जस्ट मोहब्बत: उमलत्या वयातील अलवार भावभावनांचा अविष्कार

by मानसी जोशी 11/05/2022

केबलच्या विश्वात १९९५ साली सोनी नावाच्या अजून एका चॅनेलची भर पडली. या चॅनेलने नेहमीच वेगळ्या विषयांवर आधारित कार्यक्रम द्यायचा प्रयत्न केला आहे. अगदी ‘आहट’, ‘सीआयडी’, ‘अदालत’, ‘क्राइम पेट्रोल’ अशा वेगळ्या विषयांवरच्या मालिकांपासून थेट ‘बुगी वूगी’, ‘इंडियन आयडॉल’, ‘कौन बनेगा करोडपती’, ‘बिग बॉस’ (बिग बॉसचा पहिला भाग सोनी टीव्हीवरच प्रसारित करण्यात आला होता) आणि आत्ताच्या ‘शार्क टॅंक इंडिया’पर्यंत वेगवेगळे प्रयोग या चॅनेलवर झाले आहेत. दैनंदिन मालिकांच्या विश्वातही या चॅनेलने अनेक वेगळ्या विषयांवरच्या मालिका दिल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे ‘जस्ट मोहब्बत (Just Mohabbat).’

ही मालिका ‘द वंडर इयर्स’ या अमेरिकन टीव्ही मालिकेवर आधारित होती. त्याकाळी लहान मुलांसाठी मालिका तयार होत नव्हत्या अशातला भाग नाही. अगदी दूरदर्शन पासून सर्व चॅनेल्सवर लहान मुलांसाठी चंद्रकांत, अलिफ लैला, विक्रम वेताळ, शक्तिमान, अशा कित्येक मालिका प्रसारित केल्या गेल्या. तसंच मराठीमध्ये ‘गोट्या’ ही मालिका प्रसारित करण्यात आली होती. परंतु या सर्व मालिकांमध्ये ‘जस्ट मोहब्बत ( (Just Mohabbat)’ ही मालिका वेगळी ठरली कारण इतर सर्व मालिका लहान मुलांसाठी तर होत्या त्यांच्याबद्दल नव्हत्या. जस्ट मोहब्बतने इथेच बाजी मारली. 

जय (हर्ष लुनिया, वत्सल शेठ) हा या मालिकेमध्ये मध्यवर्ती भूमिकेमध्ये आहे. जयचे आई -वडील म्हणजेच राज (सलीम शाह) आणि माया (कविता कपूर) त्याला शिकण्यासाठी डेहराडूनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवतात. जयचं कुटुंब, त्याचे खास मित्र – मैत्रिणी मधुर, रोमा, संजय आणि त्याचा काल्पनिक मित्र गौतम (आदित्य कपाडिया) या साऱ्यांशी असणारे नातेसंबंध आणि वाढत्या वयानुसार त्याची बदलत जाणारी मानसिकता या विषयाभोवती मालिकेचं कथानक फिरत राहतं. 

vatsal sheth

या मालिकेमध्ये जय लहान वयात कुटुंबापासून दूर राहायला लागल्यामुळे त्याच्या मनात निर्माण झालेली एकाकाकीपणाची आणि असुरक्षिततेची भावना, कुटुंबाची येणारी आठवण आणि नंतर हळूहळू मित्र मैत्रिणीसोबत रुळत जाणं या गोष्टी अगदी प्रभावीपणे दाखवण्यात आल्या होत्या, तर काही वर्षांच्या लीपनंतर किशोरवयात मनात फुलणारं हळुवार प्रेम, आकर्षण, प्रेमातलं यश – अपयश, मैत्रीचे धागे, उमलत्या नकळत्या वयात मनात निर्माण होणाऱ्या भाव – भावना या साऱ्या गोष्टींचं यथासांग चित्रण या मालिकेमध्ये करण्यात आलं. 

ही मालिका केवळ लहान मुलांच्याच नाही, तर मोठ्यांच्याही पसंतीस उतरली होती. १९९६ पासून २००० सालापर्यंत सलग ४ वर्ष ही मालिका चालू होती. या चार वर्षांत मालिकेमध्ये अनेक नवनवीन पात्रांची एंट्री झाली होती. सलोनी, अदिती, जे डी अंकल ही पात्र विशेष लोकप्रिय झाली होती. 

जय हा श्रीमंत कुटुंबातला मुलगा असतो. त्याचे मित्र मैत्रिणी आणि एकूणच मालिकेमध्ये श्रीमंत कुटुंबाचं राहणीमान दाखविण्यात आलं आहे. पण त्यांच्या भावना मात्र सारख्याच आहेत. मुलांमध्ये ही मालिका लोकप्रिय होण्याचं हे एक प्रमुख कारण होतं. जय, रोमा, संजय ही सर्व मंडळी मुलांना आपल्यापैकीच वाटू लागली होती. या मालिकेचं शीर्षक गीतही प्रचंड लोकप्रिय झालं होतं.

 

जयच्या भूमिकेने वत्सल शेठ या कलाकाराला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पुढे त्याने २००४ साली  ‘टारझन – द वन्डर कार’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण बॉलिवूडमध्ये त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही. काही दिवसांनी तो पुन्हा टीव्ही चॅनेल्सकडे वळला. 

याच कालावधीत मोठ्या शहरांमध्ये ‘चाईल्ड सायकॉलॉजी’चे वारे वाहायला लागले होते. त्यामुळे काही प्रमाणात प्रेक्षकवर्ग या मालिकेकडे खेचला गेला. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने वेग घेतला होता. छोट्या शहरांमध्ये सायबर कॅफे उघडले गेले होते आणि आधुनिक विचारसरणी घराघरात रुजू लागली होती. त्यामुळे मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं उच्चभ्रू समाजाचं चित्रण समजून घेणं प्रेक्षकांना तितकंसं कठीण गेलं नाही. 

==========

हे देखील वाचा – लपाछपी: थरारक, रहस्यमय, उत्कट आणि भीतीदायक

==========

आजही ही मालिका नव्वदच्या दशकात लहानाचे मोठे झालेल्या अनेकांना जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाईल. कोणाला पहिलं प्रेम आठवेल, तर कोणाला शाळेच्या दिवसातली मैत्री आठवेल, कोणाला हॉस्टेल लाईफ, तर कोणाला अजून काही. प्रत्येकाची आठवण कदाचित वेगळी असेल, पण ‘जस्ट मोहब्बत (Just Mohabbat).’ म्हटल्यावर मालिका आणि त्यासंबंधित एखादी तरी आठवण नजरेसमोर येईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood bollywood update Celebrity Entertainment Just Mohabbat
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.