ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
प्रेक्षकांसाठी सिनेमांची मेजवानी; ‘स्त्री 2’, ‘वेद’ आणि ‘खेल खेल में’ मध्ये कोण मारणार बाजी?
भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्रपटसृष्टी प्रेक्षकांना एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव दिला आहे. या दिवशी बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘स्त्री २’, ‘वेदा’ व्यतिरिक्त अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’ प्रदर्शित झाले आहेत. याशिवाय देशातील विविध भाषांमध्येही अनेक चांगले सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. एखादा थरारक अॅक्शन चित्रपट, हॉरर स्टोरी किंवा हृदयस्पर्शी ड्रामा बघायची इच्छा असलेल्यांसाठी तर १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रत्येक सिनेप्रेमीसाठी खास ठरला. चला तर मग नजर टाकूयात १५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या 3 मोठ्या चित्रपटांवर.(Bollywood Movie Release in Aug 2024)
स्त्री २ : अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री २ हा बहुप्रतीक्षित चित्रपट असून श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि अपारशक्ती खुराना पुन्हा एकदा आपल्या भूमिकेत दिसणार आहेत. या हॉरर-कॉमेडी सिक्वेलमध्ये चंदेरीत ‘सर काटा भूत’ नावाची एक नवी अलौकिक शक्ती येते. या चित्रपटात हास्य आणि भीतीचे मिश्रण असण्याची शक्यता आहे. या नव्या भागात कथा कशी पुढे जाते याची ‘स्त्री’चे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘भेडिया’मध्ये झळकलेला वरुण धवन या चित्रपटात खास भूमिकेत आहे.
खेल खेल में : रवी उदयवार दिग्दर्शित ‘खेल खेल में’ या चित्रपटात अक्षय कुमार, तापसी पन्नू आणि वाणी कपूर यांच्याही भूमिका आहेत. ‘परफेक्ट स्ट्रेंजर्स’ या इटालियन चित्रपटाचा हा रिमेक आहे. हा चित्रपट मित्रांच्या एका गटाभोवती फिरतो जे त्यांच्या फोन संदेशांची देवाणघेवाण करतात आणि रहस्ये उघड करतात, नाटकीय आणि विनोदी परिस्थिती निर्माण करतात. सगळे मिळून एक गेम खेळतात ज्याअंतर्गत प्रत्येकाला आपला मोबाईल अनलॉक करून सर्वांसमोर ठेवावा लागतो. या गेममध्ये अनेक गोष्टी समोर येतात. बॉक्स ऑफिसवर ‘खेल खेल में’ चित्रपटासमोर ‘स्त्री २‘सारख्या मोठ्या चित्रपटाशी स्पर्धा आहे.(Bollywood Movie Release in Aug 2024)
===========================
हे देखील वाचा: बॅालिवूडमधील शाहबाज खान आणि टिनू वर्मा मराठी सिनेमात खलनायकाच्या रुपात दिसणार…
============================
वेदा : निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘वेदा’ हा एक अॅक्शनपॅक्ड थ्रिलर चित्रपट आहे जो मनोरंजक कथानकासह सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतो. जॉन अब्राहम, तमन्ना भाटिया आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका माजी लष्करी अधिकाऱ्याच्या कथेवर केंद्रित आहे, जो एका तरुणीला जातीभेद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढायला शिकवतो.