Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय, ‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’!

 चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय, ‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’!
kalakruti-a-new-chapter-in-chindhis-biography-begins-sindhutai-majhi-mai-chindhi-became-sindhu'-marathi-info/
टीव्ही वाले

चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय, ‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’!

by Team KalakrutiMedia 09/10/2023

कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. ‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’ नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अश्या जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे. सिंधुताई म्हणजे एक विलक्षण चैतन्य असलेली असामान्य स्त्री. आपण आजपर्यंत चिंधीचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची तिची अटळ बांधिलकी पाहिली. आता मात्र चिंधीने सिंधू बनण्याचा विलक्षण प्रवास सुरु होणार आहे. सिंधूच्या जीवनातील अनेक आव्हाने, कठीण प्रसंग, हलाखीची परिस्तिथी आणि यामधून मार्ग काढत त्यांनी सिंधू बनण्याचा प्रवास कसा पार केला हे सगळं आत्मा हेलावून ठेवणारं आणि मन सुन्न करुन जाणार आहे. त्यांचा हा खडतर प्रवास आणि त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला हे सारं बघणं प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं आणि प्रेरणा देणारं ठरणार आहे.(Sindhutai Majhi Mai).

Sindhutai Majhi Mai
Sindhutai Majhi Mai

‘सिंधुताई माझी माई’ मालिकेच्या उत्तम कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. आणि याच उद्दिष्टाला पुढे नेत आणखी भावनिक दृष्ट्या कथानक सादर करण्याचा प्रयत्न मालिकेचा असणार आहे. तेव्हा नक्की बघा सिंधुताई माझी माई – १५ ऑक्टोबरपासून संध्या. ७ वा आपल्या कलर्स मराठी वर.मालिकेत सिंधूची भूमिका साकारणारी शिवानी सोनार म्हणाली, “या भूमिकेसाठी मी माईंनी लिहीलेलं पुस्तक वाचलं. माईंना भेटणं माझ्या नशिबात नव्हतं  पण जी माणसं त्यांना भेटली आणि माझ्या मित्रमंडळीपैकी ज्यांना भेटण्याचा योग आला त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकत मी या भूमिकेसाठी तयारी केली होती आणि अजूनही करत आहे.

Sindhutai Majhi Mai
Sindhutai Majhi Mai

शूट सुरु झाल्यानंतर, मी शहरात वाढलेली मुलगी आहे तर गावाकडची कामं, गावाकडे राहणं याची कुठे तरी तयारी नव्हती पण आता मी ह्या वातावरणाला जुळवून घेण्याचा प्रयत्न करते आहे. ह्या भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे त्याचबरोबर एक मोठी जबाबदारी असल्यामुळे कुठे तरी थोडा नर्व्हसनेस आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी १०० टक्के केला आहे. माझ्या आधीच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं त्याचप्रमाणे या भूमिकेसाठी ही देतील याची मला खात्री आहे. माईंची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न मी आणि आमची संपूर्ण टीम करत आहोत. मालिकेचे दिग्दर्शक, कलाकार या सर्वांचा मला पाठिंबा आहे.(Sindhutai Majhi Mai)

=====================

हे देखील वाचा:Marathi Serial: प्रेक्षकांसमोर दाखल होतोय ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’…!

=====================

लवकरच सिंधू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि प्रेक्षकांना आवडेल अशी मी आशा करते.”करुणा आणि आशेने भरलेल्या सिंधूताईंच्या उल्लेखनीय कथेची ही मोहक निरंतरता नक्की बघा ‘सिंधुताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’ १५ ऑक्टोबरपासून संध्या. ७ वा आपल्या कलर्स मराठी वर.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Colors Marathi Marathi Serial shivani sonar Sindhutai Majhi Mai Sindhutai Sapkal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.