Junaid Khan आमिर खानच्या मुलाला ‘लाल सिंग चड्ढा’, ‘लापता लेडीज’साठी
A. R. Rahman वाढदिवस स्पेशल: भारतीय संगीताचा ‘राजा’ – ए आर रहमान
ए आर रहमान (A. R. Rahman ) भारतातील संगीत क्षेत्रातले (Indian Music Industry) असे नाव ज्या नावाने ना केवळ भारतात तर संपूर्ण जगभरात अफाट लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. कल्पनेपलीकडील प्रतिभा असलेल्या ए आरा रेहमान यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितींवर मात करत हे नेत्रदीपक यश संपादित केले आहे. (A. R. Rahman )
भारतीय संगीताला नवीन जागतिक ओळख आणि उंची प्राप्त करून देण्यात रेहमान यांचा सर्वात मोठा वाटा आहे. आज अनेक ठिकाणी भारतीय संगीताचा चेहरा म्हणून रेहमान यांना ओळखले जाते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. रहमान यांच्या संगीतामुळे भारतीय संगीत अधिक समृद्ध झाले. आज ५ जानेवारी रोजी महान संगीतकार, आणि गायक असलेले ए आर रहमान त्यांचा ५८ वा वाढदिवस साजरा आहे. (A. R. Rehman’s 58 Birthday)
ए आर रहमान यांचे प्रत्येक गाणं थेट ऐकणाऱ्याच्या मानाचा ठाव घेते. त्यांचे एकही गाणे असे नाही जे गाजले नाही. रहमान यांचे स्लो, फास्ट कोणत्याही प्रकारचे गाणे हे हिट होणारच हे आधीपासूनच सर्वांना माहित असते. केवळ त्यांच्या नावामुळेच गाणे ऐकणारे लोकं देखील भरपूर आहेत. अशा या जादुई संगीतकाराचा आज वाढदिवस. ए आर रहमान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यतील काही रंजक गोष्टी आणि किस्से. (Entertainment mix masala)
ए.आर. रहमान यांचा जन्म एका मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबात झाला. संगीताचा वारसा आणि त्याचे बाळकडू त्यांना घरातूनच त्यांच्या वडिलांकडून मिळाले. रहमान यांच्या वडिलांचे नाव राजगोपाल कुलशेखरन म्हणजेच आरके शेखर होते. (R K Shekhar) ते दक्षिणेतले एक प्रसिद्ध संगीतकार होते. आरके शेखर यांनी अनेक मल्याळम सिनेमात संगीतकार म्हणून काम केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १२७ गाणी रचली आणि ५२ चित्रपटांना संगीत दिले.
ए आर रहमान यांचा जन्म ६ जानेवारी १९६६ रोजी चेन्नई येथे झाला होता. वडील स्कोअर कंपोजर असताना रहमानला संगीताची आवड निर्माण नाही झाली म्हणजेच आश्चर्य. त्यांनी लहानपणापासूनच संगीताचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. अनेकदा वडिलांना ते त्यांच्या कामात जमेल तशी छोटी मदत देखील करायचे. पण रहमान ९ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनाच एका आजारामुळे मृत्यू झाला. वडिलांचे छत्र हरपल्यामुळे कमी वयातच त्यांच्यावर घरची मोठी जबाबदारी येऊन पडली. (Ankahi Baatein)
वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्यावेळी घराला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी वडिलांची वाद्ये भाड्याने देऊन पैसे कमवण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी त्यांच्या आईने हा व्यवसाय सांभाळला आणि रहमान यांना जे काम करायचे त्यासाठी कामाचे स्वातंत्र्य दिले. रहमान उत्कृष्ट की-बोर्ड वाजवायचे. (Bollywood Masala)
रहमान यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. त्यांचे खरे नाव दिलीप कुमार आहे. पण त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी मुस्लिम धर्म स्वीकारला. यामागे देखील एक घटना होती, यामुळे त्यांनी धर्मांतर केले. रहमान यांच्या बहिणीची तब्येत खूपच खराब होती. अगदी ती मरणाच्या दारावर होती. अनेक उपचार करून देखील तिच्या तब्येतीमध्ये फरक पडत होता. (Musician A. R. Rahman)
तेव्हा रहमान यांच्या आईला एक फकीर भेटला. त्याने मुलाला घेऊन दर्ग्यामध्ये बोलावले. तिथे त्याने तिच्यावर काही उपचार केले आणि ती हळूहळू बरी झाली. तेव्हापासून रेहमान यांचा त्या फकीरावर तसेच दर्ग्यावर विश्वास बसला. मग त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.
रहमान यांना संगीताची आवड होती, म्हणून त्यांनी आपल्या शाळेतील मित्रांसोबत एक बँड तयार केला. त्यांनी त्यांचे शिक्षण अर्धवटच सोडले आणि पूर्ण वेळ संगीतासाठी दिला. काही काळाने त्यांनी वेगवेगळ्या संगीतकारांकडे नोकऱ्या करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी जाहिरातींच्या जिंगल बनवण्यास सुरुवात केली. (A R Rahman Journey)
अशा एकाच जिंगलसाठी रहमान यांना पुरस्कार मिळाला. तेव्हा मणिरत्नम (Maniratnam) यांची नजर रहमान यांच्यावर पडली आणि त्यांनी जरा रहमान यांचे ज्ञान आणि अभ्यासाचे निरीक्षण केले आणि ‘रोजा’ सिनेमासाठी संगीत देण्याची रहमान यांच्यावर जबाबदारी सोपवली. रहमान यांनी देखील ही संधी शेवटची संधी आहे असे समजून काम केले आणि या संधीचे सोने केले.
रोजा या सिनेमातील गाणी तुफान हिट झाली आणि आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या संगीतासाठी रहमान यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (National Award) त्यांना मोठी प्रसिद्धी, नावलौकिक आणि लोकप्रियता मिळाली. यानंतर रहमान यांच्या गाडीने वेग धरला आणि त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
रहमान यांना खरी जागतिक प्रसिद्धी मिळाली ती त्यांच्या ‘जय हो…’ या गाण्यामुळे (Jai Ho). या गाण्याने अनेक वर्ल्ड रेकॉर्ड मोडले होते. शिवाय त्यांच्या या गाण्याला ऑस्कर (Oscar) सारखा सर्वोच्च पुरस्कर देखील मिळाला. स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित १९९७ मध्ये वंदे मातरम अल्बम बनवला होता. तो अल्बम अफाट हिट झाला होता.
रहमान यांनी ‘पंचतान रिकॉर्ड इन’ हा आपला पहिला रेकॉर्डिंग स्टुडिओ चेन्नईतील त्यांच्या घराच्या अंगणात बनवला होता. याच स्टुडिओने त्यांचे आयुष्य बदलले. चेन्नईमध्ये असताना अजूनही तेच याच स्टुडिओमध्ये जास्तीत जास्त रेकॉर्डिंग करतात.
रेहमानने अरेंज मॅरेज केले होते. त्याच्या पत्नीचे नाव सायराबानो होते. मात्र काही महिन्यापूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला. अनेक वर्षांचा संसार त्यांचा तुटला. रहमान आणि सायरा बानो यांना एक मुलगा अमिन आणि खातिजा, रहिमा अशा दोन मुली आहेत.
===========
हे देखील वाचा : Deepika Padukon : यशस्वी मॉडेल ते सुपरस्टार अभिनेत्री असा प्रवास करणारी बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोण
===========
रहमान यांनी स्लमडॉग मिलेनियर, आणि तीन हॉलीवूड चित्रपटांमध्ये त्यांनी संगीत दिले आहे. यासोबतच त्यांना दोनदा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्याकडे ग्रॅमी अवॉर्डही आहे. त्यांनी आपल्या संगीतातून आतापर्यंत ६ राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. यासोबतच १५ फिल्मफेअर अवॉर्ड, १४ दाक्षिणात्य फिल्मफेअर अवॉर्ड २०१४ पर्यंत जिंकले होते. एवढेच नाही, तर जगभरातील सुमारे १३८ विविध पुरस्कारांसाठी ते नामांकित झाले आहेत. त्यातील ११७ पुरस्कार त्यांनी जिंकले. (A R Rahman Awrds)
रेहमानने तहजीब, बॉम्बे, दिल से, रंगीला, ताल, जिन्स, पुकार, फिजा, लगान, मंगल पांडे, स्वदेश, रंग दे बसंती, जोधा-अकबर, जाने तू या जाने ना, युवराज, स्लम डॉग मिलेनियर, गजनी, मिमी, अतरंगी रे सारख्या सिनेमांना संगीत दिले आहे.