‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
फिल्मी दुनियेतील निरोगी स्पर्धेचे दुर्मिळ उदाहरण!
पूर्वीच्या काळी सिनेमाच्या दुनियेत समंजस आणि परिपक्व असे नातेसंबंध होते. आजच्यासारखे एकमेकांचे पाय खेचणे , एकमेकांचा गळा कापणे, कुरघोडी करणे घाणेरडे राजकारण फार कमी होत असे. याचा एक सुंदर किस्सा मध्यंतरी वाचण्यात आला; जो त्या काळातील निरोगी वातावरण
दाखवणार आहे. खरोखरच आजच्या पिढीने हे संस्कार, हे आदर्श, हि मूल्य आणि हा वारसा जपायला पाहिजेत असं वाटतं. काय होत हा किस्सा आणि कुणाच्या बाबतीत होता हा किस्सा?
हा किस्सा स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. पूर्वीच्या काळी चित्रपट विषयक मासिकांचा फारसा सुळसुळाट झाला नव्हता. मोजकी चार-पाच मासिक त्याकाळी प्रसिद्ध होत असे. त्यातील एक महत्त्वाचे चित्रपट मासिक होते सिने हेरॉल्ड. जे लाहोरहून प्रसिद्ध होत होते आणि त्याचे संपादक बी आर चोप्रा होते. तीसच्या दशकामध्ये लाहोर, मुंबई आणि कलकत्ता हे चित्रपट निर्मितीचे प्रमुख केंद्र होती. या तीनही ठिकाणी सिने हेरॉल्ड या मासिकाचा चांगलाच बोलबाला होता. चित्रपट क्षेत्रात काम करणारी मंडळी हे मासिक आवर्जून वाचत असत. मुंबईला दिग्दर्शक मेहबूब आणि सोहराब मोदी हे देखील बी आर चोप्रा (B R Chopra) यांच्या मासिकाचे नियमित वाचक होते. हे दोघे जेव्हा लाहोरला जात असत तेव्हा आवर्जून बी आर चोप्रा (B R Chopra) यांची भेट घेवून चित्रपट विषयक चर्चा करत असत. या तिघांची चांगली मैत्री देखील झाली होती.
एकदा बी आर चोप्रा (B R Chopra) यांनी मुंबईला येण्याचा प्लॅन बनवला. या दोन मित्रांनी त्यांच्या या दौऱ्याचे स्वागत केले आणि रीतसर निमंत्रण दिले. हे दोघेही रेल्वे स्टेशनवर बी आर चोप्रा यांना घेण्यासाठी गेले. तेव्हा बी आर चोप्रानी (B R Chopra) ठरवले आपला मुंबईतला जेवढा मुक्काम असेल तो या दोघांकडे निम्मा-निम्मा करायचा. त्या पद्धतीने पहिल्यांदा ते मेहबूब यांच्या घरी पाहुणचारासाठी गेले.
या काळात मेहबूब यांनी बी आर चोप्रा (B R Chopra) यांना एक कादंबरी वाचायला दिली आणि सांगितले,” ही कादंबरी वाचून मला तुमचे मत सांगा. मला यावर चित्रपट बनवायचा आहे. तुम्ही स्वतः चांगले समीक्षक आहात. तुमचा निर्णय माझ्या साठी खूप महत्त्वाचा आहे.” दोन दिवसात चोप्रा यांनी ती कादंबरी वाचून काढली आणि मेहबूब यांना सांगितले ,” यावर चित्रपट चांगला बनू शकतो. पण हा चित्रपट तुमच्यापेक्षा सोहराब मोदी चांगल्या पद्धतीने बनवू शकतील. कारण त्यांच्या चित्रपटाचा जॉनर हा आहे. तुम्हाला हे कथानक पडद्यावर तितक्या चांगल्या पद्धतीने आणता येणार नाही. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. तुम्ही याला सकारात्मक पद्धतीने घ्यावे असे मला वाटते.” मेहबूब यांनी धन्यवाद दिल्या त्यानंतर बी आर चोप्रा (B R Chopra) हा सर्व प्रसंग विसरून गेले.
हे देखील वाचा : या कारणामुळे रावांचा रंक झाले होते भगवान
चार दिवसानंतर सोहराब मोदी यांचा बी आर चोप्रा (B R Chopra) यांना फोन आला आणि ते म्हणाले,” काल माझ्याकडे मेहबूब आले होते आणि त्यांनी एक कादंबरी माझ्या हातात सुपूर्त केली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की या कादंबरीवर मी म्हणजे सोहराब मोदी ने चित्रपट बनवावा असे तुमचे मत आहे. आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने हा चित्रपट बनवू शकाल असा आपला अभिप्राय त्यांनी माझ्याकडे दिला आहे.” यावर बी आर चोप्रा (B R Chopra) म्हणाले,” बरोबर आहे. मी तुमची चित्रपट निर्मिती पाहिली आहे. त्यावरून मी तसेच मत बनवले आहे!” त्या काळातील निरोगी स्पर्धेचे हे खूप चांगले उदाहरण होते. मेहबूब यांना चोप्रा यांचा यांचे मत आवडलेच. पण आपल्या मित्राला देखील त्यांनी ते लगेच सांगितले. इथे कुठेही मत्सर, हेवा, स्पर्धा अशा भावना नव्हत्या.
पुढे सोहराब मोदी यांनी ती कादंबरी वाचली आणि त्यावर १९४३ साली एक चित्रपट बनवला ‘पृथ्वी वल्लभ’ जो त्या काळातील एक सुपरहिट सिनेमा ठरला होता.हा एक ऐतिहासिक चित्रपट होता जो त्यानी त्यांच्या मिनर्वा मुव्ही टोन या संस्थे तर्फे बनवला होता. खरोखरच मेहबूब काय, सोहराब मोदी काय आणि त्यांना सल्ला देणाऱ्या बी आर चोप्रा काय हे खऱ्या अर्थाने सच्चे कलावंत होते आणि खरा कलावंत तोच असतो जो दुसऱ्यांच्या भावना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतो!