Bollywood and South Sequels : ‘आरआरआर’ ते ‘जवान’; हे गाजलेले

Jarann Movie: सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले करणार प्रेक्षकांवर ‘जारण’
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याच्या शब्दांनी अधिकच रंगत आणली आहे. तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांच्या संगीताने या गाण्यातून चित्रपटाबद्दलची गूढता अधिकच वाढवली आहे. त्यांच्या अफलातून संगीताने हे गाणे एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. (Jarann Marathi Movie Promotional Song)

‘जारण’च्या पोस्टरपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात टिझर आणि ट्रेलरने या उत्सुकतेत अधिकच भर टाकली. भय, अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. सोनाली आणि भार्गवीने आपल्या प्रभावी अभिनयातून या गाण्यात एक रहस्यमय आणि भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे. गाण्याचा मूड संपूर्णतः भयावह, गूढतेने भरलेला असून, त्यातील संगीत, पार्श्वभूमी आणि दिग्दर्शन प्रेक्षकांच्या मनात थरकाप निर्माण करणारे आहे.
===================================
हे देखील वाचा: Jarann Marathi Movie Trailer: काळी जादू, अंधश्रद्धा आणि विवाहितेचा भूतकाळ ५ जूनला उलगडणार…
===================================

या चित्रपटाचा भाग झाल्याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘’माझ्यासाठी हा अनपेक्षित अनुभव होता. काय गाणे असेल, आपण कोणत्या झोनमध्ये जाणार आहोत, याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी हा सुखद धक्का होता. या प्रमोशनल साँगचा झोन खूप वेगळा आहे. गाण्याचे बोल अहिराणी भाषेत असल्याने शब्द सहज कळत नाहीत. त्यामुळे ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढते”. तर भार्गवी म्हणाली की, ‘’माझ्यासाठी हा खूप वेगळा आणि छान अनुभव आहे. एकतर कधीही न साकारलेली भूमिका मी केली आहे. चित्रपटाविषयी मी ऐकून होते आणि सगळ्यांसारखीच उत्सुकता मलाही होती. गाण्याचे बोल, संगीत, चित्रीकरण सगळेच अप्रतिम आहे.’’
==================================
हे देखील वाचा: Avdhoot Gupte यांच्या ‘आई’ अल्बममधील आई-मुलाच्या नात्यातील मैत्री शोधणारे ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला..
==================================
‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.