‘भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा’ मालिकेत लक्ष्मीच्या लग्न सोहळ्याचा विशेष भाग १४ जुलैला रंगणार!
लग्न म्हणजे कौटुंबिक उत्सवच… मित्रमंडळी, सगेसोयरे यांच्यासोबतच दोन जीवांना, दोन घरांना एकत्र आणणारा मिलन सोहळाच. प्रत्येकाची लग्नाविषयी स्वत:ची स्वप्नं असतात. भावी जोडीदाराची स्वप्न पहाणाऱ्या आपल्या भूमिकन्येची म्हणजेच लक्ष्मीची सध्या जोरदार लगीनघाई सुरु आहे.लक्ष्मीच्या वडिलांनी सावकाराच्या मुलाबरोबर भूषणसोबत लक्ष्मीची सोयरीक जुळवली आहे. लग्नातील धमाल-मस्ती सोबत नववधू लक्ष्मीच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग असा सगळा आंनदी माहोल असताना लक्ष्मीच्या लग्नात एक वेगळाच ट्विस्ट येतो. नक्की काय घडतं…? हे यात पाहायला मिळणार आहे. रविवार १४ जुलै रात्री ८ वा. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा’ या मालिकेचा लग्न सोहळ्याचा विशेष भाग रंगणार आहे. मेहंदी, हळद संगीत असा सगळा माहोल यात असणार आहे.(Bhumikanya Saad Ghalate Nisargraja)
या सगळ्या आनंदी वातावरणात या सगळ्याला कशी कलाटणी मिळणार? आणि या सगळ्यामागे कोणाचा हात असणार? आता बळी आणि लक्ष्मी सगळ्या प्रकाराला कसे सामोरे जाणार ? लक्ष्मीच लग्न निर्विघ्न पार पडणार का? तिला कोणाची साथ मिळणार? की बळीला साऱ्या गावासमोर अपमान सहन करावा लागणार? या सगळ्या गोष्टीचा खुलासा येत्या रविवार १४ जुलै रात्री ८ वा. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ या मालिकेच्या विशेष भागात होणार आहे.
पीक पाण्यावर जगणारा शेतकरी अवघ्या जगाचा अन्नदाता आहे. शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. मात्र, आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी, तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला, कितीही प्रगत शेती केली, तरीही त्याला असंख्य गोष्टींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका लढाऊवृत्तीच्या कन्येची कथा ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ मालिकेतून पाहायला मिळत आहे.(Bhumikanya Saad Ghalate Nisargraja)
============================
हे देखील वाचा: महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धेत भाग घेऊन अरुंधती स्वीकारणार नवं आव्हान!
============================
‘भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका लढाऊ वृत्तीच्या कन्येची कथा ‘भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा’ मालिकेतून आहे.