Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Aadesh Bandekar : नाटकांपासून सुरु झालेला महाराष्ट्राच्या लाडक्या ‘भावोजींचा’ अभिनय प्रवास

 Aadesh Bandekar : नाटकांपासून सुरु झालेला महाराष्ट्राच्या लाडक्या ‘भावोजींचा’ अभिनय प्रवास
कलाकृती विशेष

Aadesh Bandekar : नाटकांपासून सुरु झालेला महाराष्ट्राच्या लाडक्या ‘भावोजींचा’ अभिनय प्रवास

by Jyotsna Kulkarni 18/01/2025

आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) हे नाव उच्चरताच संपूर्ण महिला वर्गाच्या तोंडातून एकच नाव बाहेर येते आणि ते म्हणजे ‘भावोजी’. ‘होम मिनिस्टर’ या शोच्या माध्यमातून आदेश बांदेकर यांनी संपूर्ण महिला वर्गामध्ये आपली एक वेगळी ओळख तयार केली. होम मिनिस्टरच्या माध्यमातून घरच्या लक्ष्मीचा सन्मान करून तिला ओळख मिळवून देणारे आदेश बांदेकर आज शो संपून देखील ‘भावोजी’ या नावानेच ओळखले जातात. (Aadesh Bandekar)

होम मिनिस्टर या शोने आदेश बांदेकर यांचे संपूर्ण जीवनच बदलून टाकले. आज संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर त्यांचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया आदेश बांदेकर यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टींबद्दल. (Aadesh Bandekar Birthday)

उत्तम सूत्रसंचालक असण्यासोबतच प्रभावी अभिनेते असणाऱ्या आदेश बांदेकर यांचा जन्म १८ जानेवारी १९६६ रोजी अलिबागमध्ये झाला. मात्र नंतर त्यांचे कुटुंब अलिबाग सोडून मुंबईत स्थायिक झाले. आदेश यांचे बालपण मुंबईतल्या लालबाग परळ या भागामध्ये गेले. आदेश बांदेकर हे त्यांच्या तीन भावंडांमध्ये मधले होते. (Aadesh Bandekar Journey)

Adesh Bandekar

सुरुवातीपासूनच खोडकर असलेल्या आदेश बांदेकर यांना अभ्यास कधीच आवडला नाही. ते नेहमीच अभ्यास सोडून शाळेलतील इतर कलेशी संबंधित स्पर्धांमध्ये पुढे असायचे. त्यांना कलेशी संबंधित अनेक गोष्टींची मनापासून आवड होती. ते चाळीत राहत असताना तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये आदेश बांदेकर आवर्जून सामील व्हायचे. नाटक, डान्स, भाषण काहीही असले तरी आदेश सर्वात पुढे असायचे. त्यांनी अशा स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे देखील कमावली. (Latest Marathi News)

पुढे आदेश यांनी त्यांचे वाणिज्य शाखेतून पदवी घेत शिक्षण पूर्ण केले. या संपूर्ण काळात देखील ते नाटकांमध्ये काम करायचे. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. नोकरी करताना देखील ते नाटक, एकांकिका करत होते, विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील ते करायचे. अशातच त्यांना दूरदर्शनवरील ‘ताक धिना धिन’ या शो चे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. (Entertainment Mix Masala)

या शोनंतर आदेश यांचा प्रवास सुरु झाला. त्यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले. पुढे त्यांच्या आयुष्यात अतिशय योगायोगाने हा होम मिनिस्टर हा शो आला. अतिशय कमी म्हणजे ६/७ भागासाठी सुरु झालेला हा शो तब्बल २० वर्ष चालला. या शोमुळे आदेश बांदेकरांना अफाट लोकप्रियता मिळाली. खासकरून महिला वर्गामध्ये त्यांचे लाडके भावोजी असलेल्या आदेश यांची लोकप्रियता खूप होती. आज हा शो संपून अनेक महिने उलटले असले तरी आदेश यांची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. (Ankahi Baatein)

Adesh Bandekar

आदेश बांदेकर यांचे व्यावसायिक आयुष्य कमालीचे यशस्वी आहे. मात्र ते अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. आदेश आणि सुचित्रा मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध कपल आहे. या दोघांच्या परफेक्ट जोडीची अनेकदा इंडस्ट्रीमध्ये मीडियामध्ये चर्चा होताना दिसते. या दोघांची प्रेमकहाणी देखील खूपच सुंदर आणि रंजक आहे.

सुचित्रा नववीत असल्यापासूच आदेशला यांना आवडत होत्या. सुचित्रा या कमलाकर सारंग यांची ‘रथचक्र’ नावाची एक मालिका करत होत्या. एका दिवसाच्या शुटिंगसाठी आदेश देखील तेव्हा त्या मालिकेच्या सेटवर तिथे गेले होते. तेव्हा शुटिंग दरम्यान तीन-चार रिटेक झाले. रिटेकच्या वेळी पायर्‍यांवर सुचित्रा बसल्या होत्या. त्यांना तिथे पाहताचक्षणी आदेश त्यांच्या प्रेमात पडले होते. (Adesh Bandekar Love Story)

आदेश त्यांचा पाठलाग करत त्यांच्या शाळेपर्यंत पोहचले होते. ते अनेकदा सुचित्रा यांच्या शाळेत जायचे. सुचित्रा यांना एव्हाना अंदाज आला होता की आदेश का सतत त्यांचा पाठलाग करत आहे. एक दिवस वैतागून सुचित्रा आदेश यांना म्हणाल्या, की मला माफ करा मी काही होकार देऊ शकत नाही. नंतर एकदा शाळा सुटल्यावर आदेश यांनी सुचित्रा यांना गाठले आणि परत भेटायला बोलावले.

Adesh Bandekar

आदेश यांनी स्टेशन जवळच्या एका हॉटेल मध्ये सुचित्रा यांना भेटायला बोलावले होते. सुचित्रा त्यांच्या एका मैत्रिणीबरोबर त्यांना भेटायला निघाल्या मात्र त्यांना कोणी बघेल याची त्यांना भिती वाटली म्हणून तिकडे न जाता त्या मैत्रिणी बरोबर दुसरीकडे फिरायला गेल्या. इकडे आदेश ३ तास त्यांची वाट पाहत बसले होते. शेवटी सुचित्रा मैत्रिणीबरोबर घरी आल्या.

सुचित्रा यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण घरी आदेश त्यांच्या आईबरोबर गप्पा मारत बसले होता. त्यांना पाहुन सुचित्रा खूप घाबरल्या होत्या. थोड्यावेळाने सुचित्राची यांच्या आई आदेश यांना घेऊन घराबाहेर पडल्या. सुचित्रा यांच्या आई बसमध्ये चढल्या, तेव्हा मला माझ्या एका मित्राला भेटायचे आहे, म्हणून आदेश बसमध्ये चढलेच नाही आणि थेट यूटर्न घेऊन पुन्हा सुचित्रा यांच्या घरी आले.

===============

हे देखील वाचा : Javed Akhtar घराण्याचा लिखाणाचा वारसा सक्षमपणे सांभाळत यश मिळवणारे गीतकार जावेद अख्तर

===============

सुचित्रा यांनी दार उघडले, त्यावेळी आदेश खूप खूप चिडले होते. ते सुचित्राला म्हणाले, हो असेल तर हो म्हण किंवा नाही म्हण. मी परत तुझ्या मागे मागे येणार नाही. मी आज तुला घेऊन महालक्ष्मीला जाणार होतो. मात्र तू आलीच नाहीस. मी तुला ५ मिनिटे देतो मला आत्ता तुझं उत्तर दे. पाच मिनिटे झाली आणि आदेश उठले, तेव्हा सुचित्रा आदेशला म्हणाल्या, कधी जायच महालक्ष्मीला! त्यांचे उत्तर ऐकून आदेश यांना खूप आनंद झाला. पुढे त्यांनी काही वर्षांनी १९९० साली त्यांनी लग्न केले.

आदेश आणि सुचित्रा यांना सोहम नावाचा मुलगा आहे. आदेश बांदेकर यांनी राजकारणात देखील प्रवेश केला असून, ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिव आहेत. यासोबतच त्यांचे ‘सोहम प्रोडक्शन’ नावाने एक प्रोडक्शन हाऊस आहे. या अंतर्गत ते अनेक मालिकांची निर्मिती करतात.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Adesh Bandekar Adesh Bandekar birthday Adesh Bandekar facts Adesh Bandekar information Adesh Bandekar journey Adesh Bandekar mahiti Adesh Bandekar unknown facts आदेश बांदेकर आदेश बांदेकर प्रवास आदेश बांदेकर माहिती आदेश बांदेकर वाढदिवस
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.