Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नवे लक्ष्य : सोहम बांदेकर

 नवे लक्ष्य : सोहम बांदेकर
गप्पा विथ सेलिब्रिटी

नवे लक्ष्य : सोहम बांदेकर

by गणेश आचवाल 28/03/2021

स्टार प्रवाह वाहिनी ही कायमच नव्या विषयांवरील मालिका आपल्यापुढे सादर करण्यात आघाडीवर आहे. नुकतेच सुरु झालेली दर रविवारी प्रसारित होणारी ‘नवे लक्ष्य’ ही मालिका विविध गुन्हे, त्यांची उकल करण्यात पोलिसांचे युनिट किती मेहनत करते हे दाखवणारी आहे. याच मालिकेत पी एस आय जय दिक्षीत ही व्यक्तिरेखा साकारतोय सोहम बांदेकर अर्थात आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा सुपुत्र सोहम बांदेकर. (Soham Bandekar)

सोहमने वझे केळकर कॉलेजमधून बी एम एम ची पदवी मिळवली आहे. त्यानंतर आपण सोहमला ओळखू लागलो ते ‘ललित २०५’ या मालिकेचा निर्माता या नात्याने. सोहम म्हणतो, “ज्यावेळी ‘ललित २०५’ चा निर्माता या नात्याने मी जबाबदारी पेलत होतो, तेव्हा एक निर्माता या नात्याने आपल्याला पडद्यामागच्या सर्व बाजू माहिती असाव्यात, असे मी ठरवले. मग दिग्दर्शन, संकलन, प्रकाशयोजना या सर्व विभागांचा मी अभ्यास करत होतो. चॅनलच्या मिटींग्ज सुद्धाझा मालिकेसाठी कशा महत्वाच्या असतात, हे मला समजत गेलं. ती माझी या क्षेत्रातील शिकण्याची प्रक्रिया होती.”

सोहमच्या मनात आपण अभिनय करावा,असं आधी खरे तर नव्हतं. पण सोहम मुळात खूप संवेदनशील असल्याने सोहम उत्तम अभिनय करू शकेल असं आदेश आणि सुचित्रा यांना वाटायचं. लॉकडाऊनचा काळ हा खरे तर सोहमच्या आयुष्याला एक वेगळं  वळण देणारा ठरला. तो या काळात आई बाबांबरोबर अनेक चित्रपट पाहायचा, मग त्यावर चर्चा करायचा. याच काळात सोहमने काही मराठी स्वगते (मोनोलॉग्ज) ऐकली, ती पाठ केली आणि त्याचा व्हिडीओ चित्रित करून आई बाबांना दाखवला. आदेश आणि सुचित्राने ते व्हिडीओज या क्षेत्रातील काही जणांना दाखवले सुद्धा होते आणि आपला मुलगा नक्की अभिनय करू शकेल, याची त्या दोघांनाही खात्री झाली होती. फक्त ही गोष्ट सोहमला तेव्हा माहित नव्हती.

Soham Bandekar

सोहम प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ चं शूटिंग सुरु होतं. सोहमला आईनं म्हणजे सुचित्रा बांदेकर यांनी फोन केला आणि एक ऑडिशन शूट करून पाठवायला सांगितली. सोहमने ती पाठवली. मग ती ऑडिशन चॅनलकडे गेली. त्या वेळी ‘नवे लक्ष्य’ या ‘सोहम प्रॉडक्शन’ची निर्मिती प्रक्रिया सुरु होती. पण आपण आपल्याच मालिकेच्या साठी ऑडिशन देत आहोत, याची कल्पना सोहमला नव्हती. मग त्याला लोकेशनवर बोलावण्यात आलं आणि तिथे पोलिसांच्या वर्दी मध्ये त्याची ‘लूक टेस्ट’झाली आणि त्यातून पी एस आय जय दिक्षीतच्या भूमिकेतून आपल्याला एक चांगला अभिनेता मिळाला अर्थात सोहम बांदेकर.

सोहम म्हणतो, “लॉकडाऊन मध्ये मी फिटनेस वर लक्ष केंद्रित केल्याचा मला फायदा होत आहे. कारण त्यापूर्वी माझं वजन खूप वाढलं होतं. लॉकडाऊन मध्ये मी फिटनेस बाबत खूप जागरूक झालो. माझं वजन कमी केलं. त्याचा फायदा आज ही पोलिसांची व्यक्तिरेखा साकारताना निश्चित होतो. पोलिसांची वर्दी परिधान केल्यावर ते दृश्य साकारताना एक वेगळी स्फूर्ती येते. मुळात यातील ‘जय’ ही व्यक्तिरेखा खूप संवेदनशील व्यक्तिरेखा असून तंत्रज्ञानाची आवड असणारा आणि त्या संदर्भात अभ्यास असणारा असा हा ‘हायटेक’ जय आहे.”

आज सोहमचे या भूमिकेसाठी खूप कौतुक होत आहे. आपणही त्याला खूप शुभेच्छा देऊया.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Entertainment Marathi Actor Television
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.