Yere Yere Paisa 3 : मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात पुन्हा ‘खळ्ळ

“Ramayana चित्रपटाचा स्क्रिनप्ले ऐकला आणि मी…” आदिनाथ कोठारे याने सांगितला अनुभव
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे… बॉलिवूडमधला हा बिग बजेट चित्रपट दोन भागांमध्ये येणार असून काही दिवसांपूर्वीच चित्रपटात कोण कोणते कलाकार दिसणार याचा अनाऊन्समेंट व्हिडिओ देखील समोर आला होता… दरम्यान, या मल्टि स्टारकास्ट चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी लागली असून नुकतंच त्याने रामायम चित्रपटात त्याला मिळालेल्या संधीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो हरहुन्नरी अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे. नेमकं आदिनाथ रामायण बद्दल काय बोलला आहे जाणून घेऊयात…

सध्या रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाचं नाव प्रत्येक भारतीयांच्या ओठांवर आहे… यात तो प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असून त्यांच्या भावाची म्हणजेच राजा भरत यांची भूमिका मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे साकारणार आहे.. रामायणात प्रभू श्रीराम आणि भरत मिलाप ही फार महत्वाची घटना मानली जाते. श्रीराम १४ वर्ष वनवासात असताना भरत यांना त्यांच्या भावाला भेटण्याची ओढ त्यांना श्रीराम यांच्यापर्यंत घेऊन येते. भरत जेव्हाप्रभू श्रीराम यांना परत न्यायला आलेले असतात तेव्हा दोन्ही भावांच्या भावनिक आलिंगनाचा तो क्षण पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे.

दरम्यान, आदिनाथ कोठारे याने ‘बॉलिवूड हंगामा’शी बोलताना म्हटलं की, “या चित्रपटात काम करायला मिळणं हा माझ्यासाठी आशिर्वादच आहे. भारतीय चित्रपटसृष्टी तयार होणारा हा सर्वात मोठा चित्रपट आहे. इतकंच काय जागतिक स्तरावर बनलेल्या आत्तापर्यंतच्या मोठ्या चित्रपटांपैकी हा एक आहे. अशा चित्रपटाचा भाग होणं यासाठी मी मुकेश छाबरा यांचा मी कायम ऋणी आहे. त्यांनीच माझं रामायण चित्रपटासाठी कास्टिंग केलं. शिवाय, नितेश तिवारी यांनी मला भरत ही भूमिका दिली. तसंच, निर्माते नमित मल्होत्रा यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला एवढी मोठी जबाबदारी सोपवली तर अशा सगळ्यांचेच मी आभार मानतो.”
================================
हे देखील वाचा: Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित आहेत का?
=================================
आदिनाथ पुढे म्हणाला की, , “रामायण चित्रपटाच्या मेकर्सच चित्रपटाबाबत जे व्हिजन आहे ते नेहमीच स्पष्ट राहिलं आहे. त्यावर ते ठाम आहेत. त्यांनी पूर्णपणे नियोजन केलं आहे. या प्रोजेक्टच्या प्री प्रोडक्शनसाठीच त्यांनी जवळजवळ १० वर्ष घालवली आहेत. नितेश सरांनी २०१६-१७ मध्ये रामायण चित्रपटाच्या लिखाणावर सुरुवात केली होती… मला वाटतं नमित सर, नितेश सर लॉकडाऊनच्या आधीपासूनच व्हीएफएक्स आणि प्री प्रोडक्शनवर काम करत आहेत. फक्त कलाकार, फिल्ममेकर, माणूस म्हणून नाही तर या भव्य सिनेमाच्या निर्मितीचा भाग होणं या सिनेमात काम करण्याची संधी मिळाणं यासाठी मी स्वत:ला भाग्यवानच समजतो. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. “
पुढे चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल बोलाताना आदिनाथ म्हणाला की, “चित्रपटाची स्क्रिप्ट पहिल्यांदा वाचल्यावर मी थक्क झाला होतो. जेव्हा स्क्रीनप्ले ऐकला तेव्हा अवाक होतो. आता प्रदर्शन, निर्मिती व्हॅल्यू, व्हीएफएक्स आणि तपशील हे सगळं सोन्याहून पिवळं असल्यासारखं आहे. मी आतापर्यंत वाचलेल्या स्क्रिप्टपैकी ही सर्वोत्तम आहे.”
================================
=================================
दरम्यान, रामायण हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पौराणिक चित्रपट असणार आहे… नमित मल्होत्रा यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे दोन्ही भागांचं बजेट जवळपास ४००० कोटी असणार आहे… त्यामुळे भारतातील या बिग बजेट चित्रपटासाठी आणि प्रत्येक भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय असणारा ‘रामायण’ नेमका कसा असणार हे पाहण्याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे… हा चित्रपट २०२६ आणि २०२७ मध्ये २ भागांमध्ये रिलीज होणार आहे… या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, आदिनाथ कोठारे, यश, रवी दुबे, लारा दत्ता, काजल अग्रवाल, सनी देओल अशे बरेच कलाकार असणार आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi