
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची ‘या’ प्रसिद्ध मालिकेत एंट्री !
Star Pravah वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ ने 30 नोव्हेंबर 2024 रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. जवळपास पाच वर्षे चाललेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या घराघरात आपली छाप सोडली. अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आशुतोष, अभी, यश, अनघा, आरोही, ईशा, अनिश, गौरी, कांचन, अप्पा अशी पात्रे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेनंतर अनेक कलाकार नवीन प्रोजेक्टमध्ये व्यग्र झाले आहेत. यामध्ये अनघा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकत आहे.(Actress Ashwini Mahangade)

अश्विनीने स्टार प्रवाहवर कमबॅक करत ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत महत्त्वाची एन्ट्री घेतली आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसाळकर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. परंतु आता मालिकेत अश्विनीचं आगमन झाल्यानं कथानकाला नवा कलाटणी मिळाला आहे. मालिकेतील ऐश्वर्या हा पात्र जानकी आणि तिच्या आईची भेट होऊ नये म्हणून सतत कटकारस्थान रचताना दिसतो. याच पार्श्वभूमीवर अश्विनी ‘माया’ या नव्या पात्राच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या २ सप्टेंबरच्या भागात तिची एंट्री दाखवण्यात आली. मायाच्या भूमिकेत अश्विनी एका भावनिक मुलीचं पात्र साकारते आहे जी जानकीच्या आईचा धीर वाढवते. तिच्या प्रवेशाने कथेत नवा रहस्य उलगडलं आहे. कारण मालिकेत दाखवण्यात आलं की, जानकीच्या आईला किडनॅप करणाऱ्या व्यक्तीनेच मायाचेही अपहरण केले होते. या घटनेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे की अखेर माया आणि जानकीचे किंवा तिच्या आईचे नेमकं काय कनेक्शन आहे? पुढील भागात हे उलगडणार आहे.(Actress Ashwini Mahangade)
=================================
हे देखील वाचा: Actress Shivali Parab रिलेशनशीपमध्ये; ‘या’ स्टार सोबतच्या फोटोमुळे चर्चांना उधाण !
=================================
दरम्यान, अभिनेत्री अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर आपल्या ‘माया’ लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. साधा पंजाबी ड्रेस, एक वेणी आणि चष्मा असा साधा पण प्रभावी लूक घेऊन ती मालिकेत झळकत आहे. तिच्या पोस्टमध्ये तिने प्रेक्षकांना मालिकेचा वेळ सांगत #मी_माया हा हॅशटॅग वापरला आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अनघा आता ‘घरोघरी मातीच्या चुली’ मधील ‘माया’ म्हणून प्रेक्षकांच्या मनाला भावते का, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. स्टार प्रवाहवरील ही नवी मालिका प्रेक्षकांना कितपत भुरळ घालते, हे लवकरच समोर येईल.